धाराशिव नगर परिषद गटनेतेपदी सिद्धार्थ बनसोडे यांची निवड
धाराशिव (प्रतिनिधी) -धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीत धाराशिव नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सिद्धार्थ अंगुल बनसोडे यांची निवड जाहीर करण्यात आली. सिद्धार्थ बनसोडे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नगरसेवक असून काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव डॉ.स्मिता शहापूरकर, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डी.सी.सी.बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते सदर उस्मान कुरेशी, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, नगरसेवक अक्षय जोगदंड, नगरसेविका उज्मासबा अजहर पठाण, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, मुहीब शेख, अशोक बनसोडे, सरफराज काझी, मैनुद्दीन पठाण, महिला जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा, मनिषा वाघमारे, प्रभाकर लोंढे, मिलिंद गोवर्धन, मौलाना शौकत सय्यद, अजहर पठाण, कफील सय्यद, आरेफ मुलानी, अभिमान पेठे, सचिन धाकतोडे, सौरभ गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.












