निष्ठावंत शिवसैनिक संदीप अनुरथ गायकवाड यांची युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उप तालुका प्रमुखपदी नियुक्ती – जिल्ह्यात शिवसैनिकांत उत्साह
धाराशिव (प्रतिनिधी):मागील अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहिलेले, तसेच पक्षात फूट पडल्यानंतरही कोणत्याही आमिषाला बळी न पडता मातोश्रीशी निष्ठा जपणारे ताकविकी ग्रामपंचायत सदस्य संदीप अनुरथ गायकवाड यांची युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उप तालुका प्रमुखपदी निवड झाल्याचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
संदीप गायकवाड यांनी मागील अनेक वर्षे गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या समस्या, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हक्क आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्या निष्ठावान पक्षकार्याची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे केवळ ताकविकी नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. योग्य कार्यकर्त्याची योग्य पदावर निवड झाल्याने पक्ष नेतृत्वाने खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना न्याय दिला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल शिवसैनिक व युवा सेनेच्या वतीने संदीप गायकवाड यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना संदीप गायकवाड यांनी सांगितले की, “ही नियुक्ती माझ्या वैयक्तिक सन्मानापेक्षा पक्षासाठी काम करण्याची आणखी मोठी जबाबदारी आहे. उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन.”












