अंबेहोळमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का विद्यमान उपसरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश
धाराशिव, (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टीच्या “सबका साथ, सबका विकास” या सर्वसमावेशक आणि लोककल्याणकारी धोरणाने प्रेरित होत अंबेहोळ (ता. धाराशिव) येथील उबाठा शिवसेना गटाचे उपसरपंच सर्फराज शेख आणि ग्रामपंचायत सदस्य फय्याज पठाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या महत्त्वपूर्ण प्रवेशावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांनी सर्व नवप्रवेशितांचे भारतीय जनता पार्टीत मनःपूर्वक स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे अंबेहोळ परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सर्फराज शेख यांनी सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला तसेच पक्षवाढीसाठी आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याबाबत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी बबलू शेख, अंबेहळ व प्रा. ए. झेड. पटेल यांनी विशेष पुढाकार घेतला.
कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निहाल काझी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष फरमान काझी, जाकेर पठाण, फहाद सिद्धीकी, अहमद पठाण यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अंबेहोळ (ता. धाराशिव) येथील उबाठा शिवसेना गटाचे उपसरपंच सर्फराज शेख व ग्रामपंचायत सदस्य फय्याज पठाण यांनी सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्याची दखल घेत सर्फराज शेख यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रवेशासाठी बबलू शेख व प्रा. ए. झेड. पटेल यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, निहाल काझी, फरमान काझी, जाकेर पठाण, फहाद सिद्धीकी, अहमद पठाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













