डोंजा जिल्हा परिषद गट उमेदवारांच्या प्रचाराचा आ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ
परांडा / लोकमदत न्यूज
परंडा तालुक्यातील डोंजा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज श्रीक्षेत्र सोनारी येथे भव्य शुभारंभ झाला. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम–परंडा–वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी काळभैरवनाथांचे दर्शन घेऊन सौ. अविदाबाई भागवत जगताप (डोंजा जि.प. गट), शशिकांत चंद्रकांत पाटील (डोंजा पं.स. गण) आणि समाधान सुभाष नलवडे (सोनारी पं.स. गण) यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार सावंत म्हणाले, “ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्यापुरती मर्यादित नसून, आपल्या गट, गण आणि गावाच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारी आहे. विकासाभिमुख, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार निवडून देण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.” तसेच येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, आरपीआय प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, माजी जि.प. सभापती नवनाथ आप्पा जगताप, रामचंद्र घोगरे सर, सोनारीचे माजी उपसरपंच अंगद आबा फरतडे, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, ॲड. रणजीत खरसडे, पै. विशाल नाना देवकर, बालाजी नेटके, ॲड. दत्तात्रय सूर्यवंशी, रोसा सरपंच रवींद्र नलवडे, कुंबेजा सरपंच शिवाजी मिसाळ, गोकुळ चव्हाण, लक्ष्मण मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
















