नाद घुमणार..! कमळ फुलणार..! — तुगाव येथे विलास रसाळ यांच्या प्रचारासाठी भाजपची घरोघरी भेट मोहीम
ढोकी जिल्हा परिषद – गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात भाजप उमेदवार विलास रसाळ यांच्या समर्थनार्थ घरोघरी जोरदार प्रचार फेरी
धाराशिव लोकमदत न्यूज
ढोकी जिल्हा परिषद अंतर्गत गोवर्धनवाडी पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विलास जगन्नाथ रसाळ यांच्या प्रचारार्थ तुगाव येथे भाजपच्या वतीने भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान कार्यकर्त्यांनी घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला व “कमळ” या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले तसेच सामान्य नागरिक म्हणून संपूर्ण ढोकी परिसरात सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळवलेले विलास रसाळ यांना भाजपने पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन सन्मान केला आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याची व लोकसंपर्काची दखल घेत पक्षाने ही संधी दिल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
प्रचार फेरीदरम्यान “नाद घुमणार, कमळ फुलणार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत रसाळ यांना पाठिंबा दर्शविला. आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या मुद्द्यांवर विजय मिळवण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या प्रचार मोहिमेमुळे गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात भाजपच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













