सांजा जिल्हा परिषद गटात शिवसेना (ठाकरे) चा वाढता प्रभाव
धाराशिव – लोकमदत न्यूज
मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तसा शिवसेना (ठाकरे) उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यातच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेना-काँग्रेस (आय) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रचार फेरी यामुळे संपूर्ण मतदारसंघात वातावरण ढवळून निघाले आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण झाला असून सांजा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रदीप सुभाष घोणे, चिखली पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेश कोळी व चिखली पंचायत समिती गणाचे उमेदवार आशा राजदीप गायकवाड यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे.
धाराशिव तालुक्यातील सांजा जिल्हा परिषद गट, गण व चिखली गणातून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या मतदार संघात शिवसेनेचे प्राबल्य असून गावागावात त्यांना प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस (आय) पक्षासोबत आघाडी झाली असून शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात राळ उडवून दिली आहे. सांजा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सांजा, चिखली, राजुरी, बोरगाव (राजे) बोरखेडा, सकनेवाडी, महाळंगी, देवळाली, मेडशिंगा, शेकापूर आदी गावांचा समावेश आहे. हा मतदार संघ शिवसेना व काँग्रेस आय पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघांमध्ये प्रदीप घोणे, सुरेश कोळी व आशा गायकवाड हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व मकरंद राजेनिंबाळकर यांनी तर आमदार कैलास पाटील व मकरंद राजेनिंबाळकर यांनी प्रचार सभा घेऊन मतदारांना या भागात शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामाची मांडणी केली आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन डोअर टू डोअर भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. विशेष म्हणजे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या उमेदवारांना गावागावांत मिळणारा उदंड प्रतिसाद हा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












