ऑल इंडिया पॅंथर सेनेचा सांजा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (ठाकरे) ला जाहीर पाठिंबा
धाराशिव – लोकमदत न्यूज
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे अनसुर्डेकर यांनी शिवसेना (ठाकरे) ला बिनशर्त जाहीर पाठिंबा जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे सांजा जिल्हा परिषद गटातील प्रदिप सुभाष घोणे व सांजा पंचायत समिती गणाच्या आशा राजदीप गायकवाड तसेच चिखली पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेश कोळी यांच्यासह इतर उमेदवारांना फायदा होणार आहे.
दिलेल्या पाठिंबामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जाहीर पाठिंबा देत आहोत. त्यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांना ना आवाहन करण्यात येते की, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून देऊन विजयी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष हुंबे अनसुर्डेकर यांनी केले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













