शहापूर गटाचा आजपर्यंत झाला नाही असा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करा – बनसोडे
धाराशिव – लोकमदत न्यूज
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची निवडणूक अंतिम टप्प्यात आले आहे. या मतदारसंघांमध्ये अनेक समस्या असून त्या कोणीही सोडवलेले नाही. मी महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. मतदारांशी डोअर तू डोअर संपर्क होत असून प्रतिसाद चांगला मिळत आहे. माझा विजय निश्चित असून शहापूर जिल्हा परिषद गटाचा आजपर्यंत कोणीही केला नाही असा विकास करणार असल्याचे आश्वासन शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार सुनील बनसोडे यांनी दि.६ फेब्रुवारी रोजी दिले.
पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की, शिवसेना-भाजप महायुतीच्या माध्यमातून आ राणाजगजितसिंह पाटील यांनी मला या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह दिले असून या भागामध्ये महायुतीचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मी उमेदवारी घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या मतदार संघातील प्रत्येक गावांमधील प्रत्येक समाज घटकातील व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्या वैयक्तिक समस्या विचारण्यावर भर देत आहे. मात्र, ते सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या सोडवाव्यात असा आग्रह धरीत आहेत. या समस्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्या व्यवस्थित करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणे आणि त्यामध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध देऊन कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था करणे, तसेच शेत रस्ते व ग्रामीण रस्त्यांची कामे करणे. गावांतर्गत रस्ते व घनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासह शासनाच्या योजना आदींचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे मला ग्रामीण भागातील प्रश्नांची अगदी जवळून जाण असून त्या सोडविण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा ठाम विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे या मतदारसंघांमध्ये माझ्यासमोर विरोधकांचे कुठल्याही स्वरूपाचे आव्हान नाही. कारण त्यांना ग्रामीण भागाची जाण नसून त्यांच्या समस्या काय आहेत ह्या समजून घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही व करणार देखील नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदारांनी जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवारांना मोठ्या विजयी करावे असे आवाहन बनसोडे यांनी केले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












