धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका
धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव
धाराशिव – लोकमदत न्यूज
धाराशिव शहरातील रहिवासी तसेच धाराशिव शहर छेडछाड पथकातील पोलीस कर्मचारी व सध्या मुंबई येथे Exterment विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अरफत सिद्दीकी यांनी गुंडगिरी मोडून काढण्यासाठी केलेल्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांनी प्रमाणात देऊन विशेष सत्कार करुन गौरव केला. दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे हे विशेष.
अरफत सिद्दीकी हे धाराशिव शहरातील रहिवासी असून ते २००८ मध्ये धाराशिव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यांनी महिला छेडछाड प्रतिबंधक पथकामध्ये तत्कालीन पोलीस पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक माया पानसे यांच्या समवेत धडाकेबाज कामगिरी केली. या सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) दिली. ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना नाशिक येथे २०१८ मध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तर डोंगरी पोलिस ठाण्यात २०१९ – २२ व जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे त्यांनी पोलिस उप निरीक्षक काम पाहिले. तसेच ते २०२४ पासून अंतापहिल पोलीस ठाण्यात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या धडाकेबाज कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिलेला नाही. त्यांनी ३०० पेक्षा जास्ती प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० गुंडांना तडीपार केले आहे. तर एका अट्टल गुंडाला महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, १९८१ (एमपीडीए) कायद्यांतर्गत धडक कारवाई करीत त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल सानप, दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल राथोड, सपकाळ यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यामुळे धाराशिव शहराचे नाव उज्ज्वल करण्याचे काम करणाऱ्या सिद्दीकी यांच्या या अभिमानास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












