• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

उजनी धरणावर नगराध्यक्षांचा पाणी पुरवठा सभापती विना पाहणी दौरा अंतर्गत वादात ?

lokmadat news by lokmadat news
February 15, 2026
in राजकारण
0
0
SHARES
64
VIEWS

उजनी धरणावर नगराध्यक्षांचा पाणी पुरवठा सभापती विना पाहणी दौरा अंतर्गत वादात ?

गटनेते शिंदे आणि पाणी पुरवठा सभापती आऊट !

आपली जबाबदारी सोडून दुसरीकडे ढवळाढवळ ?

धाराशिव – लोकमदत न्यूज 

धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणावर नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी उपाध्यक्ष, काही नगरसेवक व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसह भेट देत शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. मात्र, या दौऱ्यानंतर धाराशिव नगर परिषद सत्ताधारी भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे रंगू लागली आहे.

धाराशिव नगर परिषदेत नगराध्यक्ष नेहा काकडे व उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांना त्यांच्या जबाबदारीची निश्चिती करून दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विषयांना प्राधान्याने न्याय देणे क्रमप्राप्त ठरते. ढोबळेकडे असलेली स्वच्छतेची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून शहर स्वच्छ करणे गरजेचे आहे. शहरात सध्या अस्वच्छता प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरली असून दुर्गंधीची बजबजपुरी माजलेली आहे. ती व्यवस्थित करण्याला प्राधान्य देण्याऐवजी आपली जबाबदारी सोडून दुसरीकडेच ढवळाढवळ करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे नगर परिषदेमध्ये सत्ताधारी भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून सर्व कारभार आमच्याच हातात असल्यासारखे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष वावरत असल्यामुळे सत्तेंतर्गत मोठी कारस्थाने रचली जात असल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेत पाणी पुरवठा सभापती म्हणून विलास लोंढे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. परंतू पाणी पुरवठा सभापती लोंढे आणि गटनेते अमित शिंदे यांना या दौऱ्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती न देताच पाहणी केली असल्याचे बोलले जात आहे. कळस म्हणजे शहराचा पाणी पुरवठा ज्यांच्या नेतृत्वाखाली चालतो, त्या सभापतींना वगळून दौरा करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच
पाणी पुरवठा अभियंत्याऐवजी स्वच्छता निरीक्षकांना सोबत नेण्यात आल्यानेही विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नगर परिषदेत बहुमताने सत्ता स्थापन केल्यानंतरही स्वच्छता, दुर्गंधी, लाईट व्यवस्था आणि आता पाणी पुरवठा अशा विविध प्रश्नांवरून प्रशासन व सत्ताधारी गट वारंवार चर्चेत येत आहेत.
दरम्यान, या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना राजकीय गटबाजीची किनार लागणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या पाहणी दौऱ्यात नेमकी कशाची पाहणी केली की फक्त फोटोसेशन आणि रील्स केल्या ? अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल

Next Post

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

Related Posts

राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
Next Post

'महाकाली कला केंद्रा'तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT