• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा २४ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे आक्रोश मोर्चा !

lokmadat news by lokmadat news
February 17, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
37
VIEWS

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा २४ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे आक्रोश मोर्चा !

  धाराशिव दि. १७( प्रतिनिधी )विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहे.
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेचे शुल्क माफ करण्यात यावे. या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत, तरी देखील भरमसाठ परीक्षा शुल्क घेऊन केवळ तिजोरी भरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे शुल्क तात्काळ कमी करण्यात यावे.
मुलींचे मोफत शिक्षण हा निर्णय सर्वस्तरांवर अद्यापही लागू झाला नसून यामध्ये अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. शासनाने काढलेल्या परिपत्रकात व महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या शुल्कात मोठी तफावत आहे. महाविद्यालयांकडून फक्त ट्युशन फी माफ केली जात आहे. त्यामुळे हे मोफत शिक्षण असू शकत नाही. ही घोषणा विद्यार्थिनींना संभ्रमित करणारी आहे. या योजनेची अंमलबजावणी सर्व विद्यार्थिनींसाठी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार करण्यात यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या प्रवेश, परीक्षा आणि निकाल या विषयांना घेऊन सातत्याने अनेक समस्या समोर येत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्याची विद्यापीठाची कुठली ही सकारात्मक भूमिका दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे मानसिक आणि आर्थिक छळ थांबण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात. तसेच संलग्नित महाविद्यालयांना अन्य विद्यापीठात वर्ग होण्याची मुभा देण्यात यावी.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व संलग्नित महाविद्यालय मधील शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विद्यापीठातील रिक्त असलेली प्राध्यापक पदे तातडीने भरली जावी. तसेच आरोग्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षा शुल्कात कपात व पायाभूत सुविधांच्या सुधारणा करणे अत्यंत अत्यावश्यक आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.आजच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणात अनेक महाविद्यालयांत डिजिटल साधनांचा व शिक्षकांचा तीव्र अभाव आहे. संगणक, इंटरनेट, ई-लर्निंग सुविधा व शिक्षक संख्या तातडीने वाढवावी.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात याव्या व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे.
अनेक शासकीय वसतिगृहांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना खाणावळीची व्यवस्था देखील उपलब्ध नाही व उपलब्ध असल्यास अत्यंत निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जाते. यामुळे शासकीय वसतिगृहांचे नूतनीकरण तसेच खानावळीची योग्य व्यवस्था विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी.
रुग्णसेवा, रात्रपाळ्या आणि ताणतणावाच्या कामामुळे Interns व Resident Doctors यांना मिळणारा स्टायपेंड अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांचे स्टायपेंड वाढवण्यात यावे, जेणेकरून ते अधिक सक्षमपणे सेवा प्रदान करू शकतील.
आयटीआय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारा भत्ता हा वेळेवर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हा भत्ता वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा.
आयटीआय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी असणारी उपकरणे व साहित्य जीर्ण अवस्थेत आहे. आयटीआय महाविद्यालयातील विविध इमारती कोसळून पडण्याच्या अवस्थेत आलेल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारतींचे बांधकाम तसेच प्रात्यक्षिकासाठी लागणारे अद्यावत उपकरणे  उपलब्ध करून देण्यात यावी. नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी केंद्रीय पद्धती प्रमाणे ८०:२० असा पॅटर्न लागू करण्यात आलेला आहे. हे अन्यायकारक असून सर्वांना नोकरीमध्ये समान संधी देण्यात यावी.अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांचा खात्यावर जमा करण्यात यावेत.
           अशा विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दुसऱ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नसल्यामुळे वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. तरी या आक्रोश मोर्चात सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आहे. असे आव्हान देखील आक्रोश मोर्चा प्रमुख भार्गव मंजुळे यांनी यावेळी केले.

SendShareTweet
Previous Post

धाराशिव शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय

Next Post

“लालपरी’ अधिक सुरक्षित होणार एसटीच्या सुरक्षेसाठी ₹१११ कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प – प्रताप सरनाईक

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

"लालपरी' अधिक सुरक्षित होणार एसटीच्या सुरक्षेसाठी ₹१११ कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प - प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT