• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

अजितदादांच्या सासरवाडीत नगर परिषदेत पडला विसर !श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का नाही ?

lokmadat news by lokmadat news
February 27, 2026
in राजकारण
0
0
SHARES
65
VIEWS

अजितदादांच्या सासरवाडीत नगर परिषदेत पडला विसर !

श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का नाही ?

‘कानफुक्या रिल्स स्टार’ फुशारकी मारण्यातच गुंग !

धाराशिव / लोकमदत न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धाराशिवचे जावई स्व अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तर राज्य सरकारने तीन दिवसाचा दुखवटा पाळला. तसेच अनेक नगर परिषद आणि ग्रामपंचायतने देखील त्यांना श्रद्धांजली वाहणारे ठराव पारित केले. मात्र, धाराशिवचे जावई असलेल्या अजितदादांना खुद्द सासरवाडीतील धाराशिव नगर परिषदेने पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहने व तसा ठराव घेणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे नगर परिषदेची सत्ता देखील त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. त्यातच ‘कानफुक्या रील्स स्टार’ म्हणून नव्यानेच धाराशिव शहरामध्ये चर्चेत असलेल्या…
त्या सभापतीने देखील बाकीच्या बिनकाम्या उचापती करण्याऐवजी या विषयाला प्राधान्य दिले असते तर त्याच्या हातून चांगले काम झाले असते, अशी चर्चा रंगू लागली आहे.

धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची पहिली सभा दि.१३ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. या सभेत मागील इतिवृत्तास मंजुरी देण्यासह इतर विविध विषय घेऊन त्यास मंजुरी दिली. मात्र, धाराशिवचे जावई आणि सासुरवाडीच्या ताब्यात सत्ता असलेल्या कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेमध्ये सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांच्यासह कानफुक्या रील स्टार सभापती व नगरसेवक यांना अजितदादांच्या श्रद्धांजली अर्पण करून तसा ठराव घेण्याचा विसर पडला की जाणीवपूर्वक विसर पाडला गेला ? कारण अजितदादांचे विमान अपघातामध्ये दि. २८ जानेवारी रोजी दुर्दैवी दुःखद निधन झाले. ही वार्ता समजताच अजितदादांचे जवळचे नातेवाईक आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह इतरांनी तात्काळ बारामतीकडे धाव घेतली. तर राज्य सरकारने देखील तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला. तसेच संसदेने देखील श्रद्धांजली अर्पण केली. तर राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व गाव स्तरावर ग्रामपंचायत मध्ये देखील श्रद्धांजली सभा घेऊन तसा ठराव पारित केले. धाराशिव नगर परिषदेमध्ये देखील  श्रद्धांजली वाहून ठराव घेणे अपेक्षित व क्रमप्राप्त होते. मात्र, सतत राजकारण डोळ्यासमोर ठेवणाऱ्या व राजकारणाच्या नशेत नगर परिषदेच्या सत्ताधारी मंडळींनी विशेषतः ‘कानफुक्या रील्स स्टार’ला अवांतर विषय आणून त्यावर चर्चा घडवली. मात्र, धाराशिवच्या जावयास श्रद्धांजली वाहण्याचा विषय त्याच्यात तोंडून निघाला नसल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

रमजानच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १७ मध्ये तात्काळ उपाययोजना सुरू करा नगरसेवक इस्माईल शेख व एजाज काझी यांची नगर परिषद प्रशासनाकडे विनंती 

Next Post

लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT