• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

lokmadat news by lokmadat news
March 1, 2026
in राजकारण
0
0
SHARES
87
VIEWS

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण स्थगित!
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आश्वासनानंतर मुंढे यांचे उपोषण मागे!

धाराशिव | लोकमदत न्यूज

शहरातील जिजाऊ चौक (बार्शी नाका) ते बोंबले हनुमान चौक या अतिदुरावस्थेतील रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दूरध्वनीवरून दिलेले आश्वासन तसेच नगराध्यक्ष नेहा काकडे, बांधकाम सभापती अभिजित काकडे आणि उप मुख्याधिकारी यांनी तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दिनकर उर्फ दादासाहेब वसंतराव मुंडे यांनी रविवारी (दि. १ मार्च) आपले उपोषण मागे घेतले.
दि. २५ फेब्रुवारीपासून मुंडे यांनी संबंधित रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू केले होते. या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली असून मोठमोठे खड्डे, साचलेला फुफाटा आणि उडणारी धूळ यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून वारंवार अपघात होत आहेत. परिसरात शैक्षणिक संकुले असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी नगर परिषद व जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा लेखी व तोंडी मागण्या केल्या; मात्र केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. दरम्यान, बसस्थानक ते हनुमान चौक मार्गे बार्शी नाका या रस्त्याचे काम सुरू असताना तेच काम जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौकपर्यंत वाढवावे, अशी ठाम मागणी मुंडे यांनी केली होती. त्यांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडेही लेखी निवेदन दिले होते; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
उपोषणाची दखल घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तीन महिन्यांत निधी उपलब्ध करून रस्ता काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बांधकाम सभापती अभिजित काकडे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक सुजित साळुंखे, नगर परिषद उप मुख्याधिकारी तथा आरोग्य निरीक्षक अभिजित गोरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळपाणी घेऊन उपोषण स्थगित केले. यावेळी उपमुख्याधिकारी गोरे, नगरसेवक राहुल काकडे, सुजित साळुंके तसेच डॉ. संतोष मुळे, डॉ. दत्ता बुर्ले, डॉ. सुभाष वाघ, आबा मुंडे, चंद्रजित जाधव, शीतल देशमुख, मोहन मुंडे, प्रमोद देशमुख, नानासाहेब बोराडे, प्रितम मुंडे, कृष्णा मुंडे, रवींद्र अंबुरे, पांडुरंग लाटे, बापू खुणे, अशोक उंबरे, सुनील पंगूडवाले, विश्वजित देशमुख, बुबा उंबरे, दादा पाटील, तानाजी माने, बालाजी सुरवसे, दत्ता शेवाळे, बिरू ढगारे, गणपत घोडके, रामा पिंगळे, विजय धोंगडे, संभाजी आहेर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

Next Post

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

Related Posts

राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका सत्ताधाऱ्यांना उशिरा का होईना जाग!
शिवसेना (उ.बा.ठा.) नगरसेवकांचा पुढाकार अजितदादांना सभागृहात पुन्हा श्रद्धांजली

February 27, 2026
राजकारण

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर “या” ताराखेला होणार निवड

February 27, 2026
Next Post

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT