• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

केशेगावात महिलांचा रौद्र मोर्चा अवैध दारू अड्डे उध्वस्त, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

lokmadat news by lokmadat news
August 22, 2025
in क्राईम
0
0
SHARES
230
VIEWS

धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे महिलांनी प्रथमच मोठ्या संख्येने एकत्र येऊन अवैध दारू अड्ड्यांविरोधात थेट मोर्चा काढत रौद्ररूप धारण केले. गावात अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या वेग वेगळ्या दारूच्या धंद्यामुळे असंख्य संसार उद्ध्वस्त झाले, काहींनी दारूच्या नादात जीव गमावले. त्यामुळे हतबल झालेल्या महिलांनी अखेर या अवैध धंद्याचा शेवट करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला.

महिलांनी गावातील प्रमुख रस्त्यावरून घोषणाबाजी करीत दारूविरोधी मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी थेट अवैध दारूच्या अड्ड्यांवर धडक मारली. दारूची दुकानं, अवैध दारू साठा आणि पत्र्याची शेड्स उलथून टाकून महिलांनी सर्व अड्डे उध्वस्त केले. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना सोबत घेत गावातील सर्व दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यास भाग पाडले.

या आंदोलनावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, मात्र पोलिस मात्र कुठेही दिसले नाहीत. एका गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना स्थानिक पोलिस / बीट अंमलदार काय करत होते, असा सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दारू अड्डे चालविणाऱ्यांशी मिलीभगत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांकडे करत आहेत.  गावात प्रथमच महिलांनी दाखविलेल्या या जाज्वल्य भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून महिलांच्या एकजुटीमुळे गावात महिलांनी दारूबंदीचा ठोस निर्णय लागू  करण्यास प्रशासनास भाग पाडले आहे.

Tags: cmodharashivकेशेगावग्रामपंचायतग्रामसभाग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिवदारूबंदीधाराशिव पालकमंत्रीपोलीस अधीक्षकबेंबळी पोलीस स्टेशनमहिला मोर्चाराज्य उत्पादन शुल्क मंत्री
SendShareTweet
Previous Post

हरवलेले / चोरीस गेलेले ५ लाख किंमतीचे ३३ मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून पोलीसांनी फिर्यादींना केले परत

Next Post

ऑनलाइन गेमिंगवर अंकुश : खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्या मागणीला यश

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

February 15, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
Next Post

ऑनलाइन गेमिंगवर अंकुश : खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्या मागणीला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT