• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

रस्ते, कॉम्प्लेक्स, अनधिकृत होर्डिंग्ज आणि पाण्याच्या मुद्द्यावर विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी हतबल!.

lokmadat news by lokmadat news
March 18, 2026
in राजकारण
0
0
SHARES
199
VIEWS

रस्ते, कॉम्प्लेक्स, अनधिकृत होर्डिंग्ज आणि पाण्याच्या मुद्द्यावर विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी हतबल!..

भाजपा गटनेत्यांनि सर्वसाधारण सभा इन कॅमेरा घेण्याची मागणी केल्याने सत्ताधारी गोटात उफाळली खदखद

धाराशिव लोकमदत न्यूज

धाराशिव नगर परिषदेमध्ये पारदर्शक कारभार करण्याचा वादा निवडणुकीपूर्वी केला होता. मात्र सर्वसाधारण बैठकीमध्ये पारदर्शक कारभाराऐवजी संशय निर्माण करणारे निर्णय घेत आहेत. एका सत्ताधारी पदाधिकाऱ्याच्या प्लॉटला खास नगर परिषदेच्या नाट्यगृहापासून थेट समता नगरकडे रस्ता करण्यासाठी मिलिटरी हॉस्पिटल व नगर वाचनालय पाडून रस्ता देण्याचा ठराव सभागृहात मांडला गेला. हा विषय कोणी विषय पत्रिकेवर आणला ? असा प्रश्न सत्ताधारी भाजपचे गटनेते अमित शिंदे यांनी नगराध्यक्षांना विचारला. त्यावर नगराध्यक्ष ऐवजी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनीच पालकमंत्र्यांनीच हा विषय मला घ्यायला सांगितल्याचे उत्तर दिले. विशेष म्हणजे नगर परिषदेची सर्वसाधारण सभा यापुढे इन कॅमेरा घ्यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांनी केल्यामुळे नगराध्यक्षांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत समता नगर येथे भाजप पदाधिकाऱ्याचा प्लॉट आहे. त्याला रस्ता देण्यासाठी नगर परिषदेच्या नाट्यगृहापासून नगर परिषदेची संरक्षक भिंत तोडून मिलिटरी हॉस्पिटल व नगर वाचनालयाची बिल्डिंग तोडून त्याच्या मधोमध पुढे माने हॉस्पिटलकडे रस्ता देण्याचा घाट सत्ताधारी मंडळींनी घातला आहे. त्यासाठी तसा ठराव देखील विषय पत्रिकेत समाविष्ट केला. हा विषय समोर येताच सत्ताधारी पक्षाचे गटनेते अमित शिंदे यांनी हा विषय कोणी आणला ? असा प्रश्न विचारला. त्याला नगराध्यक्षांनी उत्तर देणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांच्या ऐवजी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी हा विषय पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेण्यास मला सांगितले असे उत्तर दिल्याने सभागृह अचंबित झाले. पाण्याच्या टाकीचे बांधकाम शाहू नगर येथील खुल्या प्लॉट (ओपी जागा) वर मागील अनेक दिवसांपासून सुरू केले असून त्यासाठी निधी देखील खर्च केलेला आहे. याबाबत नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी अशा जागावर दहा टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही असा आक्षेप घेतला. मात्र, त्याच कामाचा ठराव आजच्या बैठकीत मांडून बहुमताच्या जोरावर पारित केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चपने यांच्या दुकानालगत असलेल्या खुल्या जागेवर नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कॉम्प्लेक्स उभारण्याचा ठराव देखील सत्ताधाऱ्यांनी मांडला. मात्र, शिवसेना (ठाकरे) चे नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी शहरात वाहनांच्या पार्किंगसाठी एक ही जागा नाही. त्यामुळे तेथे कॉम्प्लेक्स करण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका घेत कडाडून विरोध केला. मात्र, तो देखील बहुमताच्या जोरावर संमत केला. तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील १४४/४ या खुल्या जागेवर विकसित करण्याचा ठराव मांडला आहे. ती जागा समता गृहनिर्माण सहकारी संस्थेची असून याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात न्यायालय प्रलंबित असल्याचे शिवसेना (ठाकरे) चे नगरसेवक नाना घाटगे यांनी निदर्शनास आणून दिले. तर नाना घाटगे यांनी उजनी धरणातील पिण्याचे पाणी दूषित असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना कॅन्सरने आजारी असल्याचे सांगत त्याची आवश्यक ती तपासणी करून घ्या असे सुचविले. त्यावर सत्ताधाऱ्यांनी तुम्हीच सांगा कोणत्या तपासण्या करायच्या ? असा बेजबाबदारपणे उलट प्रश्न केला. या बैठकीत एएमआयएम पक्षाचे अझहर मुजावर यांनी कब्रस्तानसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली. तर पठाण उजमा सबा अजहर खान यांनी ईदगाह मैदान येतील भिंत बांधणे तसेच ईदगाह परिसरातील लोखंडी कमान दुरुस्त करण्याची मागणी केली.

मागील बैठकीत परवानगी शिवाय डिजिटल बॅनर लावायचा नाही असा ठराव सर्वानुमती घेतला होता. मात्र, त्यानंतर खुद्द नगराध्यक्षांनीच स्वतः घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन नियमबाह्यपणे शुभेच्छाचे बॅनर लावलेले आहेत असा प्रश्न सचिन पवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे कायदे करणाऱ्यांनी पाळायचा नसतो का ? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच शहरात डिजिटल बॅनर लावण्यासाठी २४ पॉईंट निश्चित करण्यात आले असून १५६ डिजिटल बॅनर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार असून तेंडरधारकांनीच लोखंडी अँगल बसवावेत असा ठराव देखील मागच्या बैठकीतच घेतलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात सत्ताधारी अयशस्वी ठरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.

महिला पतीच बनले कारभारी ?

एकीकडे पंचायत राज अभियानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे महिला नगरसेवक असताना देखील त्यांना कारभार करू दिला जात नाही. तसेच काही सत्ताधारी महिला नगरसेवकांचे पतीच नगरपरिषदेच्या कारभारात लुडबुड करीत असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे अबला नगरसेविका सबला होणार की नाही ? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
या बैठकीत विरोधी पक्षाकडून नगरसेवक सचिन उर्फ राजाभाऊ पवार, नाना घाटगे शिवसेना (ठाकरे), सिद्धार्थ बनसोडे (काँग्रेस), एएमआयएम पक्षाचे अजझर मुजावर, पठाण उजमा सबा अजहर खान व इस्माईल शेख यांनी प्रश्न मांडले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

जनतेच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट खासदार पुरस्कार मिळण्याचा मान – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर        

Next Post

कब्रस्तान स्वच्छतेचा प्रश्न सभागृहात ए आय एम आय एम पक्षाचे नगरसेवक अझहर मुजावर यांचा पुढाकार

Related Posts

राजकारण

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026
राजकारण

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026
राजकारण

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

March 27, 2026
राजकारण

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

March 26, 2026
राजकारण

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

March 26, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

March 20, 2026
Next Post

कब्रस्तान स्वच्छतेचा प्रश्न सभागृहात ए आय एम आय एम पक्षाचे नगरसेवक अझहर मुजावर यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT