• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी – बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

lokmadat news by lokmadat news
March 17, 2026
in क्राईम
0
0
SHARES
355
VIEWS

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी – बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

बांधकाम मजूर म्हणून नोंद असलेला धाराशिवचा ‘तो’ माजी नगराध्यक्ष कोण? आ. सुरेश धस यांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट!

बोगस नोंदी, मयत व्यक्तींच्या नावावर लाभ जिल्ह्यात खळबळ

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगार योजनांमधील कोट्यवधींच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा अखेर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला असून, आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, धाराशिवमधील एका माजी नगराध्यक्षाची बांधकाम मजूर म्हणून नोंद झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी सभागृहात केल्याने “तो माजी नगराध्यक्ष कोण?” याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.
‘लोकमदत न्यूज’ने बांधकाम कामगार विभागातील गैरव्यवहार, दलालांचा सुळसुळाट आणि बोगस नोंदींचा प्रकार उघडकीस आणत सातत्याने वृत्तांकन केले होते. या वृत्तांची दखल घेत आमदार धस यांनी हा मुद्दा लक्षवेधीद्वारे विधानसभेत मांडला. त्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी प्रत्यक्षात बांधकामाशी संबंध नसलेल्या व्यक्तींची कामगार म्हणून नोंदणी करण्यात आली असून त्यांच्या नावावर शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाटण्यात आला आहे.
यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी मयत व्यक्तींनाही जिवंत दाखवून त्यांच्या नावावर कामगार नोंदणी करण्यात आली आणि योजनांचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा त्यांना “मृत” दाखविण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व प्रकारामध्ये दलाल, काही अधिकारी आणि मध्यस्थ यांची संगनमताने भूमिका असल्याचा गंभीर आरोप सभागृहात करण्यात आला.
या प्रकरणावर उत्तर देताना कामगार मंत्री ॲड. आकाश पांडुरंग फुंडकर यांनीही बोगस नोंदी झाल्याची कबुली देत संपूर्ण प्रकरणाची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
धाराशिव जिल्ह्यात सुमारे ३१ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी असून, या माध्यमातून शैक्षणिक मदत, संसारोपयोगी साहित्य, विमा व इतर अनेक योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे बांधकाम कामगार विभागातील दलालांचे धाबे दणाणले असून प्रशासनही सतर्क झाले आहे. ‘लोकमदत न्यूज’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय थेट विधानसभेत पोहोचला असून, आता चौकशीच्या माध्यमातून सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष या चौकशीकडे लागले असून, “बांधकाम मजूर” म्हणून नोंद असलेला तो माजी नगराध्यक्ष नेमका कोण, याचा उलगडा कधी होणार, याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

अर्थसंकल्प अधिवेशनातील आ.सुरेश धस यांनी मांडलेले मुद्दे व्हिडिओ पाहण्यासाठी lokmadat news चॅनलला लाईक सबस्क्राइब करा

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

उच्चशिक्षित नगरसेविका पठाण यांची सभागृहात प्रभावी मांडणी शाळांसाठी वर्गखोल्या आणि ईदगाह मैदानाला कमान उभारणीची मागणी

Next Post

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

क्राईम

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

March 29, 2026
क्राईम

धाराशिव नगर परिषद पाण्यासाठी जनता त्रस्त… निर्जन भागात मात्र लाखोंच्या पाईपलाईन! यामागील मुख्य ‘आका’ कोण?

March 27, 2026
क्राईम

‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

March 20, 2026
क्राईम

कलेच्या नावाखाली देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार 4 कला केंद्रांवर रॅकेटचा पर्दाफाश, 9 आरोपींवर गुन्हा

March 20, 2026
क्राईम

गॅस टंचाई – फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

March 19, 2026
क्राईम

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

March 18, 2026
Next Post

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्या - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT