• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

lokmadat news by lokmadat news
March 20, 2026
in राजकारण
0
0
SHARES
160
VIEWS

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

सर्वसाधारण सभेचा एकमताने ठराव मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या आदेशान्वये तात्काळ अंमलबजावणी

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या प्रश्नावर अखेर ठोस पावले उचलण्यात आली असून नगरपरिषदेकडून व्यापक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात वाढलेल्या बेकायदेशीर होर्डिंगमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर ‘लोकमदत न्यूज’ने सातत्याने प्रकाश टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पाठपुराव्यानंतर नगरपरिषद प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून कारवाईला वेग आला आहे.

नगरपरिषद सर्वसाधारण सभेत अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवण्याचा ठराव सर्व पक्षांच्या वतीने एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करत कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तात्काळ आदेश देत शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केली. त्यांच्या आदेशानंतर स्वच्छता विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाईला सुरुवात केली आहे.

शहरातील अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे वाहतूक, सौंदर्यीकरण तसेच विद्युत सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, काही राजकीय घटकांकडून अजूनही आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांना स्पष्ट आवाहन केले आहे की, नगरपालिकेने निश्चित केलेल्या फिक्स पॉईंटवरच होर्डिंग लावावीत. याशिवाय होर्डिंगसाठीचे दर कमी करण्यात आले असून नियमीत परवानगी घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

स्वच्छता निरीक्षक तथा उप मुख्याधिकारी अभिजीत गोरे यांनी सांगितले की, “अनधिकृत होर्डिंगला कोणतीही मुभा नाही. केवळ अधिकृत ठिकाणीच होर्डिंग लावावीत. तसेच प्रत्येक होर्डिंगवर परवानगीची तारीख व QR कोड नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.”

दरम्यान, ‘लोकमदत न्यूज’ने अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर वारंवार वृत्तप्रसिद्धी करून प्रशासनाला जागे केले. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही कारवाई शक्य झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत असून, शहरातून ‘लोकमदत न्यूज’चे आभार मानले जात आहेत.

नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे धाराशिव शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित व सुबक होण्यास मोठी मदत होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

कलेच्या नावाखाली देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार 4 कला केंद्रांवर रॅकेटचा पर्दाफाश, 9 आरोपींवर गुन्हा

Next Post

एसटीला आर्थिक बळकटी देण्यासाठी बहुआयामी योजना ५०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्नाचे लक्ष्य – प्रताप सरनाईक

Related Posts

राजकारण

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026
राजकारण

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

March 27, 2026
राजकारण

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

March 26, 2026
राजकारण

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

March 26, 2026
राजकारण

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

March 17, 2026
राजकारण

उच्चशिक्षित नगरसेविका पठाण यांची सभागृहात प्रभावी मांडणी शाळांसाठी वर्गखोल्या आणि ईदगाह मैदानाला कमान उभारणीची मागणी

March 17, 2026
Next Post

एसटीला आर्थिक बळकटी देण्यासाठी बहुआयामी योजना ५०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्नाचे लक्ष्य - प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

March 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT