• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

lokmadat news by lokmadat news
March 20, 2026
in क्राईम
0
0
SHARES
239
VIEWS

‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पिंजरा, महाकाली, साई कला केंद्रांवर गंभीर आरोप; महिलांना जबरदस्ती व अल्पवयीन मुलींचा संशय – राज्यभर तपासणीचे निर्देश देण्याची मागणी

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्ह्यात कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अनैतिक प्रकारांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, धाराशिवसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आलेल्या कला केंद्रांच्या परवान्यांचा गैरवापर होत असून लोककलेच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा, महाकाली आणि साई कला केंद्र या ठिकाणी महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलले जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी अल्पवयीन मुलींना फसवून आणले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, यामागे मानवी तस्करीसारखा गुन्हेगारी अँगलही असू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, इतर जिल्ह्यांप्रमाणेच काही ठिकाणी गुन्हे दाखल होऊन परवाने रद्द करण्याची कारवाई झाली असली, तरी धाराशिवमध्ये अशा प्रकारांवर अद्याप ठोस आणि व्यापक कारवाई झालेली दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कला केंद्रांची महिला पोलीसांच्या माध्यमातून अचानक व वारंवार तपासणी करण्यात यावी, तसेच ज्या ठिकाणी अनैतिक प्रकार आढळतील त्यांचे परवाने तात्काळ रद्द करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे “कला केंद्र” या संकल्पनेलाच धक्का बसत असून खऱ्या लोककलावंतांच्या प्रतिमेलाही फटका बसत आहे. त्यामुळे महिला सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

एसटीला आर्थिक बळकटी देण्यासाठी बहुआयामी योजना ५०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्नाचे लक्ष्य – प्रताप सरनाईक

Next Post

राज्यातील वृत्तपत्रांसाठी 150% दरवाढीची मागणी व्हॉईस ऑफ मीडियाचे आंदोलन तीव्र

Related Posts

क्राईम

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

March 29, 2026
क्राईम

धाराशिव नगर परिषद पाण्यासाठी जनता त्रस्त… निर्जन भागात मात्र लाखोंच्या पाईपलाईन! यामागील मुख्य ‘आका’ कोण?

March 27, 2026
क्राईम

कलेच्या नावाखाली देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार 4 कला केंद्रांवर रॅकेटचा पर्दाफाश, 9 आरोपींवर गुन्हा

March 20, 2026
क्राईम

गॅस टंचाई – फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

March 19, 2026
क्राईम

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

March 18, 2026
क्राईम

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी – बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

March 17, 2026
Next Post

राज्यातील वृत्तपत्रांसाठी 150% दरवाढीची मागणी व्हॉईस ऑफ मीडियाचे आंदोलन तीव्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT