• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव नगरपरिषदेसाठी ५ मेगावॅट सोलार प्रकल्पाचा मार्ग मोकळा? वीज बिलावर नगर पालिकेस मोठा दिलासा!.

lokmadat news by lokmadat news
March 25, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
102
VIEWS



धाराशिव नगरपरिषदेसाठी ५ मेगावॅट सोलार प्रकल्पाचा मार्ग मोकळा? वीज बिलावर नगर पालिकेस मोठा दिलासा!.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या नेतृत्वात बचतीकडे वाटचाल

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव नगरपरिषदेला पाणीपुरवठ्यासाठी दरमहा येणाऱ्या भरमसाठ वीज बिलाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यात येत आहेत. उजनी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरावी लागत असल्याने नगरपरिषदेला लाखो रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वीज तोडणीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी सोलार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव शहराजवळ असलेल्या वरवंटी शिवारात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या सुमारे १५ एकर जमिनीवर ५ मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही जमीन नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या जागेची प्राथमिक पाहणी करण्यात आली असून सोलार प्रकल्प उभारणीसाठी ती उपयुक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे नगरपरिषदेला वीज बिलावर होणारा लाखो रुपयांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच सोलार ऊर्जा निर्मिती करून ती महावितरणला देण्याची योजना असल्याने भविष्यात आर्थिक बचत आणि स्थिर वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
या पाहणी दौऱ्यात पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, बांधकाम सभापती अभिजीत काकडे, नगरसेवक पंकज भोसले, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, वरवंटी गावचे तलाठी तसेच वारी सोलार प्रकल्प भगवान शेजुळ यांच्या सह इतर कंपनीचे प्रतिनिधी आणि अधिकारी  उपस्थित होते.
हा सोलार प्रकल्प कार्यान्वित झाल्यास धाराशिव नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ३००० अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

Related Posts

महाराष्ट्र

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026
महाराष्ट्र

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव..की.. आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव…की… आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा फोल १५ दिवसांनी घरपोच सेवा, रांगा कायम, बीएसएनएलवर मेसेज बंद

March 25, 2026
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

March 25, 2026
Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT