• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

lokmadat news by lokmadat news
March 29, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
17
VIEWS

यात्राकाळात एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस फेऱ्यांवर भर

विभाग नियंत्रक अजय पाटील यांचे प्रभावी नियोजन भाविकांना सुलभ प्रवासासह एसटीच्या उत्पन्नवाढीकडे वाटचाल

धाराशिव | लोकमदत न्यूज

चैत्री यात्राकाळ लक्षात घेऊन धाराशिव विभागात राज्य परिवहन महामंडळाने व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी केली असून भाविकांच्या सोयीसाठी तब्बल 206 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशान्वये विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे.

येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी स्वतंत्र 151 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये धाराशिव आगारातून 30, तुळजापूर 31, उमरगा 10, परंडा 20, भूम 30 आणि कळंब आगारातून 30 बसेसचा समावेश आहे.

तसेच चैत्री पंढरपूर, शनि शिंगणापूर व तुळजापूर यात्रांसाठी स्वतंत्र 55 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात धाराशिव 10, तुळजापूर 12, उमरगा 5, कळंब 12, भूम 10 आणि परंडा 6 बसेसचा समावेश आहे.

चैत्री पंढरपूर-शिंगणापूर यात्रा 27 मार्च 2026 ते 1 एप्रिल 2026 दरम्यान होणार असून तुळजापूर-येडेश्वरी येरमाळा यात्रा 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 दरम्यान पार पडणार आहे. मुख्य दिवस 2 एप्रिल (पौर्णिमा) व 3 एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे.

यात्राकाळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन, अतिरिक्त फेऱ्या, चालक-वाहकांची उपलब्धता तसेच यांत्रिक तपासणी यावर विशेष भर देण्यात आला आहे. विभागीय वाहतूक अधिकारी व यांत्रिक विभाग यांच्यात समन्वय साधून सर्व बसेस सुरक्षित आणि वेळेवर धावतील याची दक्षता घेतली जात आहे.

विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना आवश्यक सूचना देत यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी काटेकोर नियोजन केले आहे.

दरम्यान, या अतिरिक्त फेऱ्यांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असून यात्राकाळ हा केवळ सेवा नव्हे तर व्यवसायवृद्धीचीही संधी ठरत आहे.

भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवास सेवा देण्यासोबतच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव..की.. आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

Next Post

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

Related Posts

महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव..की.. आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव…की… आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा फोल १५ दिवसांनी घरपोच सेवा, रांगा कायम, बीएसएनएलवर मेसेज बंद

March 25, 2026
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

March 25, 2026
महाराष्ट्र

धाराशिव नगरपरिषदेसाठी ५ मेगावॅट सोलार प्रकल्पाचा मार्ग मोकळा? वीज बिलावर नगर पालिकेस मोठा दिलासा!.

March 25, 2026
महाराष्ट्र

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ३००० अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण

March 24, 2026
Next Post

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT