• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

lokmadat news by lokmadat news
March 30, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
103
VIEWS

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त!

धाराशिव – लोकमदत न्यूज

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरातील आठवडी बाजारात सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरले असून, नाले, सांडपाणी / संडास आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळच भाजीपाला व फळांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ताजी व आरोग्यदायी समजून घेतली जाणारी भाजी येथे ‘विषासमान’ ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
नगरपरिषदेकडून आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा व सिमेंटचे कट्टे तयार करून देण्यात आले असतानाही बहुतांश विक्रेते मुख्य रस्त्यावरच गाड्या लावून व्यवसाय करत असल्याने वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, किरकोळ अपघात आणि वादांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आतमध्ये प्रशस्त बाजारपेठ रिकामी असताना रस्त्यावरच बाजार भरत असल्याने नियोजनाचा पूर्णपणे अभाव (फज्जा उडत) असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अधिक गंभीर बाब म्हणजे नाल्यांच्या कडेला, सांडपाण्याच्या ठिकाणी भाजीपाला विक्री होत असून, अनेक ठिकाणी डुक्कर व इतर जनावरे त्या भाज्यांवर ताव मारताना दिसतात. त्याच भाजीपाला पुन्हा ग्राहकांना विकला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले असून, काही व्हिडिओही समोर आले आहेत. अशा परिस्थितीत धाराशिवकरांच्या अन्नात रोज ‘घाणीचा बुस्टर डोस’ मिसळला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीवेळी स्वच्छता, सुविधा आणि नियोजनाचे मोठमोठे आश्वासन देण्यात आले होते. आठवडी बाजार विकसित करण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांची कामे मंजूर होऊनही ती आजतागायत रखडलेली आहेत. सत्ता बदलानंतर या कामांना स्थगिती मिळाल्याने हा प्रश्न गेली चार वर्षे प्रलंबित असून, फक्त आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या नावावर मोठा गाजावाजा करणारे ‘रील स्टार’ स्वच्छता सभापती (नगरसेवक) यांनी 5 जानेवारी 2026 रोजी अधिकाऱ्यांसह आठवडी बाजाराची पाहणी करून सर्व समस्या तात्काळ सोडवण्याची घोषणा केली होती. मात्र तीन महिने उलटूनही परिस्थिती जैसे थेच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरात केवळ रील्स आणि प्रसिद्धीसाठी स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप होत असून, प्रत्यक्षात घाणीचे साम्राज्य कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे.
याउलट, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. आठवडी बाजारातील जागा तातडीने स्वच्छ करून, पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नियोजित विक्री यासाठी ठोस उपाययोजना केल्यासच नागरिकांना दिलासा मिळू शकतो. शहराच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने पुढाकार घेऊन आदर्श निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धाराशिवकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वच्छता सभापतींनी केवळ रिल्स काढण्याएवढाच दिखावा न करता प्रत्यक्ष कामगिरीतून जबाबदारी सिद्ध करावी, तर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आठवडी बाजाराचा चेहरामोहरा बदलावा अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
लोकमदत न्यूज  सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

Next Post

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

Related Posts

सामाजिक

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026
सामाजिक

नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटींचा निधी मंजूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

March 28, 2026
सामाजिक

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा तारीख जाहीर

March 27, 2026
सामाजिक

स्मृती बुद्ध विहार व बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनांकडून कामठा गावाचा तरुण शंभू रोकडे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

March 26, 2026
सामाजिक

धाराशिव येथे राज्यस्तरीय गंगाधर करंडक नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा

March 19, 2026
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी अखेर जागा मिळाली ४० वर्षांची प्रतीक्षा संपली!…

March 17, 2026
Next Post

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT