• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा

lokmadat news by lokmadat news
April 1, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
32
VIEWS

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा पुढाकार लाखो सवलतधारकांना पारदर्शक व सुलभ सेवा

मुंबई | लोकमदत न्यूज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी ‘RuPay On-The-Go’ NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा ताई पवार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले.
या वेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगिता पालकर व वर्षा कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते NCMC स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांना थेट लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून एसटी बस प्रवासातील सवलती सहज आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार असून, संपूर्ण प्रणाली अधिक डिजिटल होणार आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी सेवा अधिक आधुनिक, सोयीस्कर आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असून, भविष्यात प्रवाशांचा अनुभव अधिक सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी M/s. E-Infochips Technologies Ltd. आणि NSDL Payments Bank यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. राज्यातील सर्व आगार व बसस्थानकांवर नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सुमारे ३ हजार अधिकृत केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या डिजिटल उपक्रमामुळे एसटी प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि विश्वासार्ह होणार असून, प्रवाशांना नव्या युगातील स्मार्ट सेवांचा अनुभव मिळणार आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

धाराशिव बसस्थानकात ज्येष्ठ व दिव्यांगांची लूट? ‘199’ चा फलक, वसुली मात्र 250 च्या…. एजन्सी दलालांचा मनमानी कारभार कॅमेरात कैद!

Related Posts

महाराष्ट्र

धाराशिवचा आर्थिक कायापालट होणार! १०८ नवे उद्योजक घडवण्याचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा संकल्प,

April 1, 2026
महाराष्ट्र

मुख्यमंत्री रोजगार’मध्ये सलग चौथ्या वर्षी धाराशिव राज्यात अव्वल जिल्ह्याची ऐतिहासिक गगनभरारी आमदार राणाजगजितसिंह पाटील

चार वर्षात ३१०० प्रकल्पांना मंजुरी : आमदार राणाजगजितसिंह पाटील

March 31, 2026
महाराष्ट्र

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026
महाराष्ट्र

एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल यात्राकाळात येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस ची सोय

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव..की.. आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026
महाराष्ट्र

‘गंगाधर करंडक’ स्पर्धेकडे प्रेक्षकांची पाठ! राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा असूनही प्रचाराचा अभाव…की… आयोजकांवर प्रश्नचिन्ह!

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा

April 1, 2026

धाराशिव बसस्थानकात ज्येष्ठ व दिव्यांगांची लूट? ‘199’ चा फलक, वसुली मात्र 250 च्या…. एजन्सी दलालांचा मनमानी कारभार कॅमेरात कैद!

April 1, 2026

धाराशिवचा आर्थिक कायापालट होणार! १०८ नवे उद्योजक घडवण्याचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा संकल्प,

April 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT