धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी) –
धाराशिव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांची महत्वाची व तातडीची बैठक उद्या दिनांक २५ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत धाराशिव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार असून, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे मनसे धाराशिव तालुकाध्यक्ष सलीमभाई औटी यांनी या बैठकीसाठी सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन केले आहे.
बैठकीत तालुक्यातील संघटनात्मक कामकाज, पक्षविस्तार आणि पुढील कार्ययोजना यावरही सविस्तर चर्चा होणार असल्याचे तालुकाध्यक्ष औटी यांनी स्पष्ट केले आहे.












