धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी):धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगारांनी मनसे धाराशिव तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. या वेळी वीज, बांधकाम, वाहतूक, किरकोळ व्यवसाय अशा क्षेत्रातील अडचणींबाबत चर्चा झाली.
कामगारांनी शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. पाशाभाई शेख यांनी सर्व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत प्रशासनाकडे निवेदन सादर करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला मनसे वीज कामगार राज्य सचिव विशाल कांबळे, तालुका सचिव शिवानंद ढोरमारे, उपशहराध्यक्ष सुधीर शिंगाडे, विभागाध्यक्ष राजेंद्र कुराडे, बलभिम बनसोडे, अमित गायकवाड यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मनसे नेहमीच लढा देईल असा विश्वास शेख यांनी यावेळी व्यक्त केला.












