धाराशिव दि,२४ (प्रतिनिधी):दिनांक 23/08/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी नामे गौस वहीद पठाण वय 50 वर्ष रा एकता नगर धाराशिव, ता जि धाराशिव याच्याकडे चोरीचा मुद्देमाल आहे, अशी बातमी मिळाल्यावर सदर आरोपीस त्याचे वाहनासह सिताफिने ताब्यात घेऊन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने विनायक ॲग्रो मौजे किनी जिल्हा धाराशिव या धान्याच्या गोडाऊन चे शटर तोडून त्याच्या साथीधारासह हरभऱ्याचे कट्टे चोरी केले असल्याचे सांगितले. त्यावरून पोस्ट ढोकी गुन्हे अभिलेख तपासला असता पोस्टे ढोकी गुर नं 235/ 25 कलम 305 अ 334 भान्यास अन्वये हरभऱ्याचे कट्टे चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले.नमूद आरोपीकडे चोरीचा मुद्दे मालाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल अडत लाईन धाराशिव येथे विकला असल्याचे सांगितले त्यावरून सदर मुद्देमालाचा शोध घेऊन हरभऱ्याचे एकूण 2559 किलो वजनाचे 43 कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड वाहन असा एकूण किंमत 6,29,000 रुपये किमतीचा चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या अन्यसाथीदारांची नावे तसेच चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदर चा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे, ढोकी येथे पुढील कारवाई कामी हजर केले आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण,प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, चापोका नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.












