धाराशिव -धाराशिव (उस्मानाबाद) शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात नगर परिषद प्रशासन व राज्य शासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत शहर काँग्रेसतर्फे आज नगर परिषद गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा त्रास, रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीपुरवठ्याची अडचण, बाजारातील असुविधा, पथदिवे बंद पडणे, कचरा डेपोची दुर्गंधी, तसेच भुयारी गटार योजनेतील निकृष्ट कामे या प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी करीत काँग्रेसने प्रशासनाला जाब विचारला.
आंदोलनानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे तसेच जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
काँग्रेसच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1) शहरातील सर्व भागात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आलेले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता नियमित व याेग्य प्रकारे करण्यात यावी.
2) शहरातील नागरिकांना विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना भटक्या कुत्र्यांच्या झुंडीना सामाेरे जावे लागत आहे. यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवितास धाेका निर्माण झालेला आहे. त्यामुळे तातडीने माेकाट जनावरांचा (कुत्र्े, डुक्कर, गाय-बैल) बंदाेबस्त करण्यात यावा.
3) शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार याेजनेचे काम अत्यंत धिम्या गतीने व दर्जाहीन हाेत आहे. सदर काम जलद गतीने व गुणवत्तापूर्ण करण्यात यावे.
4) शहरातील रस्ते व नाल्यांची तात्काळ दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे.
5) आपले शहर जिल्हयाचे ठिकाण असून आपली नगर परिषद ‘अ’ वर्ग दर्जाची असूनही शहरात नागरिकांसाठी एकही उद्यान उपलब्ध नसणे ही
दुर्देवाची गाेष्ट आहे. त्यामुळे शहरातील उद्यानांची तातडीने दुरुस्ती तसेच सुशाेभीकरण करण्यात यावे.
6) शहरातील आठवडी तसेच दरराेजच्या बाजारातील असुविधा दूर करण्यात याव्यात.
7) अनेक भागात पथदिवे बंद आहेत ते तातडीने सुरू करावेत.
8) शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करण्यात यावा.
9) शहरातील कचरा डेपाेच्या दुर्गंधीचा व घाणीचा त्रस परिसरातील रहिवाशांना व शेतकèयांना हाेत असल्याने कचरा डेपाेचे स्थलांतर करण्यात यावे.
10) भाेगावती नदीचे स्वच्छता व साैंदर्यकरण यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्याप्रमाणे नियाेजन करण्यात यावे.
11) शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे यातून नागरिकांना श्वसनाचे व घशाचे आजार उध्दभवत आहेत. यावर उपाययाेजना करण्यात यावी.
12) शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी.
13) शहरातील जुने तात्पुरते मंजुर रेखांकनास अंतीम मंजुरी देण्यात यावी.
जोरदार घोषणाबाजीने नगर परिषद परिसर दणाणून गेला होता.
आंदोलनात काँग्रेस नेते विश्वासराव शिंदे, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव डॉ.स्मिता शहापूरकर, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक सय्यद नादेरुल्लाह हुसेनी, मुनीर कुरेशी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, युवकचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, सदर उस्मान कुरेशी, अंगुल बनसोडे, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, अशोक बनसोडे, सरफराज काझी, अभिषेक बागल, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, राजुदास आडे, प्रेमानंद सपकाळ, अभिमान पेठे, जयसिंह पवार सर, शहाजी मुंडे सर, प्रभाकर लोंढे, अझर पठाण, रणधीर घुटे पाटील, आरिफ मुलानी, संतोष पेठे, मिलिंद गोवर्धन, धवलसिंह लावंड, कफील सय्यद, महादेव पेठे, सौरभ गायकवाड, अभिषेक बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, नंदकुमार पडवळ, राजेंद्र कुऱ्हाडे, मौलाना शौकत सय्यद, मिलिंद बनसोडे, हज्जु शेख, सुनील बडूरकर, इक्बाल कुरेशी, सागर गायकवाड, माजी नगरसेवक अलीम शेख, अब्दुल लतिफ, हरिदास शिंदे, सचिन धाकतोडे, शाहनवाज सय्यद, मन्सूर कुरेशी, संजय गजधने, आनंद बनसोडे, राहुल बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष धीरज पाटील तसेच प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार यांनी उपस्थित राहून समर्थन दिले. काँग्रेसने इशारा दिला की, शहरातील मूलभूत सुविधा प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल.












