कळंब : कळंब तालुक्यातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड – पंढरपूर एक्सप्रेस (11413/11414) या गाडीला आता कळंब रोड स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने ११ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत आदेश काढून या थांब्याला मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे 6 अखेर रेल्वे बोर्डाने मान्यता दिली.
रेल्वे प्रशासनाने या थांब्याला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली असून, लवकरच अंमलबजावणी होणार आहे. या काळात तिकीट विक्री व प्रवाशांचा प्रतिसाद यावर देखरेख ठेवून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
या निर्णयाने कळंब परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बाजारपेठेतील व्यवहारासाठी, तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना या थांब्यामुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल तालुक्यातील नागरिकांनी खा. राजेनिंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.












