लोहारा तालुक्यातील मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले पिक काही तासांच्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले असून अनेकांचे उत्पन्न कोलमडले आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन केली.
पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनी, उद्ध्वस्त झालेले पिके आणि हताश चेहऱ्याने उभे असलेले शेतकरी पाहून खासदार निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व त्यांना धीर दिला. “शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ एका वर्गापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाच्या उदरनिर्वाहाचा कणा आहे. शासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने या प्रश्नाकडे पाहून शेतकऱ्याना तात्काळ मदत देणे करिता पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना प्रशासनास केल्या.
“शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा मिळेपर्यंत मी पाठपुरा वा करत राहीन,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार कोळेकर, तालुका कृषी अधिकारी, तसेच प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. यावेळी अविनाश देशमुख, अभिमन्यू देशमुख, शब्बीर शेख, रणधीर रावसाहेब देशमुख ,प्रताप देशमुख, शिवराम देशमुख, विष्णू माने ,मुन्ना राजे देशमुख, बाळासाहेब देशमुख, शौकत फिरणारे, काकासाहेब सुरवसे, प्रवीण देशमुख, गोविंद देशमुख पंडीत दादा ढोणे, विठ्ठल साठे, उपसरपंच फुलचंद आळंगे गोवर्धन आलमले, दादा मुळे, गोपाळ ढोणे, शहाजी आळंगे, अच्युत चिकुंद्रे, मुस्सा सय्यद, महेश साठे, सहेबाज सय्यद अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












