धाराशिव – मौजे भांडगाव, ता. परंडा, जि. धाराशिव येथील दलित समाजाच्या (बौद्ध समाज) पवित्र स्मशानभूमीवर ग्रामपंचायतकडून शासकीय योजनेच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकार समाजातील शांतता आणि धार्मिक भावनांना भलताच धक्का देणारा असून, भविष्यात जातीय तणाव आणि कायदा-सुव्यवस्था भंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. राऊत म्हणतात की, ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि शाखा अभियंते या अतिक्रमणाचे साक्षीदार असूनही ते जाणून-बुजून कटकारस्थान केले आहे
स्मशानभूमीवरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि बांधकाम तात्काळ थांबवावे.
दोषींवर अतिक्रमण प्रतिबंधक कायदा 1961,अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 आणि IPC कलम 295, 295A अंतर्गत कठोर कारवाई करावी.
दोषींना सेवेतून तत्काळ निलंबित करावे.
राऊत यांनी इशारा दिला की,योग्य ती कारवाई झाली नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून समाजाच्या पवित्र स्मशानभूमीचे रक्षण केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष संपत सरवदे, आणि शिवाजी ढेरे, जनार्दन गायकवाड यांच्या सह्या आहेत.












