धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – ईद -ए- मिलाद्दू नबी पैगंबर जयंतीनिमित्त दि.८ सप्टेंबर रोजी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सय्यद यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दि.३ सप्टेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ईद -ए- मिलाद्दु नबी पैगंबर जयंतीनिमित्त दि.५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी मिरवणूक गणपती विर्सजनामुळे दि. ८ ऑगस्ट रोजी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. त्यामुळे दि. ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी. इस्माल धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर रोजी येत असून गणेश विसर्जन ६ सप्टेंबर रोजी आहे. जुलूस मार्गात गणपती मंडळाचे शेड, विद्युत रोषणाई व देखावे असतात. जुलसची गदी व देखावे यात काही अनुचित घटना घडून शहराची शांतता, बंधुभाव व एकात्मता अबाधित राखण्याची आपली सगळ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दि. २८ जुलै रोजी ईद ए मिलाद जुलूस कमिटीची बैठक घेण्यात आली. सर्व मौलाना यांनीही बैठक घेऊन जुलूस ८ सप्टेंबर रोजी काढण्यात यावा असे सूचित केले म्हणून या बैठकीत सर्वानुमते जुलूस यापूर्वीही साल सन २०२३, २०२४ ला ही दोन दिवसानंतर गणेश विसर्जनाच्या दोन दिवसानंतर मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचाच आदर्श सबंध महाराष्ट्राने घेतला होता. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम हे ठरल्या प्रमाणे ५ सप्टेंबर रोजीच होतील. ऑल इंडिया खिलाफत कमिटी मुंबई यांनी देखील ८ सप्टेंबर रोजीच जुलुस काढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावनाचा आदर करुन दि. ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी घोषीत करावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद खलील सैफ (सर) यांनी केली आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












