धाराशिव : धाराशिव नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात गणेश मूर्तीची स्थापना मोठ्या श्रद्धा व उत्साहात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी (गुरुवार) नगरपरिषद प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथील सभागृहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
गणपतीची आरती झाल्यानंतर गणेश मूर्तीसमोर महा प्रसाद (नैवेद्य) दाखवून सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नागरिक व कर्मचारी वर्गासाठी भोजनाचे विशेष नियोजन यावेळी करण्यात आले होते.
या प्रसंगी नगरपरिषदेमधील श्रीमती जयश्री पाटील लेखापाल,श्रीमती वैशाली आवाड सुवर्ण जयंती विभाग प्रमुख,संतोष गायकवाड पाणीपुरवठा विभाग लिपिक,संगीता शिंदे प्रधानमंत्री आवास योजना विभाग प्रमुख, शामा अनभुले लिपिक,कर्मचारी उषा कोठावळे, मंगल निकम, राजाभाऊ पवार आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष दीपक तावडे (os) नगरपरिषद कर्मचारी गणेश मंडळातर्फे गणपती स्थापना, आरती व महाप्रसाद कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाचा नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घेतला.












