• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय


कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

lokmadat news by lokmadat news
September 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
92
VIEWS

धाराशिव – कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा करून कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. त्यानंतर झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले असून, त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून उत्पादन खर्चात कपात होईल आणि उत्पन्नवाढीच्या दिशेने वाटचाल होईल. कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या यंत्रसामग्रीवरील करदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, गवत कापणी यंत्र, पिक कापणी मशीन, कंपोस्टिंग मशीन यांवरील जीएसटी दर १२ टक्के वरून ५ टक्के करण्यात आला आहे. तर ट्रॅक्टर पार्ट्सवरील करदर १८ टक्के वरून ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे दुरुस्ती व देखभाल खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. याबरोबरच सिंचन व्यवस्थेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे. हातपंप, स्प्रिंकलर, ड्रिप सिंचन प्रणाली यांवर ५ टक्के करदर लागू करण्यात आला आहे. पाणी बचत, कमी खर्च आणि शाश्वत शेतीसाठी हे मोठे पाऊल आहे. यासह खते व कीटकनाशकांवरही मोठी सवलत देण्यात आली असून रासायनिक खते, जैविक कीटकनाशके यांवरील करदर आता ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पादन करता येईल. याशिवाय बायोगॅस प्लांट, सौर ऊर्जा उपकरणे,हातगाड्या मध्ये देखील करदर कपात करण्यात आली आहे. यामुळे शाश्वत व पर्यावरणपूरक साधनांचा वापर सुलभ होणार असून या सर्व सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नवाढीला चालना मिळणार असून भारतीय जनता पार्टी सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय हे शेतकरी-केंद्रित धोरणांचे स्पष्ट उदाहरण आहे, असे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले.

Tags: bjpcmodharashiv lokmadat newsभारतीय जनता पक्ष धाराशिव osmanabad उस्मानाबादमहाराष्ट्र
SendShareTweet
Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीने डीपीडीसी निधीच्या स्थगितीचा तिढा सुटला.!

Next Post

मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त फैजाने रजा मस्जिद वाशी येथे भव्य व महा रक्तदान शिबिराचे आयोजन

Related Posts

महाराष्ट्र

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026
महाराष्ट्र

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026
महाराष्ट्र

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026
महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
Next Post

मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त फैजाने रजा मस्जिद वाशी येथे भव्य व महा रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT