वाशी दि.०४(प्रतिनिधी): मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त वाशी येथे भव्य व महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी फैजाने रजा मस्जिद, आदर्श नगर, वाशी येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून, यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. रक्तदान म्हणजेच एखाद्या गरजू रुग्णाला नवे जीवन देणे होय. या माध्यमातून मानवतेचा दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मोहम्मद पैगंबरांनी आपल्या शिकवणीत सांगितले आहे की, “सर्वोत्कृष्ट मनुष्य तो आहे जो इतरांच्या उपकारासाठी जगतो.” या पवित्र शिकवणीला उजाळा देत रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी होणे हे खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा आहे, असे आयोजकांनी सांगितले.
आयोजक समितीच्या वतीने वाशी तालुक्यातील सर्व नागरिकांना भावनिक आवाहन करण्यात येत आहे की, या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवून एखाद्याच्या आयुष्याला नवा श्वास द्या. आपले काही क्षण आणि काही थेंब रक्त एखाद्या घरात पुन्हा हास्य आणू शकतात.













