२२ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा
धाराशिव : दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे नेतृत्व माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष सुधीर वाघमारे यांनी केले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रणित डिकले, जिल्हा उपाध्यक्ष रुस्तम खान पठाण, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाधक्षा अनुराधा लोखंडे, जिल्हा संघटक विकास बनसोडे, महिला आघाडीच्या महासचिव रुखमिणी बनसोडे, जिल्हा संघटक मंगल आवाड, लक्ष्मी गायकवाड, लोचना भालेराव, शितल चव्हाण, माजी प्रसिद्धी प्रमुख शेखर बनसोडे, नामदेव वाघमारे, आकाश पांडागळे, अमोल अंकुशराव, सोमनाथ नागटिळे, विनायक दुपारगुडे, नितीन अलकुंटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कामगारांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जर या कालावधीत कामगारांच्या हिताचे निर्णय झाले नाहीत, तर येत्या २२ सप्टेंबर २०२५ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा युनियनकडून देण्यात आला आहे.












