मुरूम दि.०७(प्रतिनीधी):श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा फोरम, पुणे यांच्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि स्थानिक स्टार्टअप इकोसिस्टमचा विकास घडवून आणण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले, आणि एनसीन एंटरप्रेनरशिप स्टार्टअप अँड इनोव्हेशन एन्सिन फोरमचे संचालक श्री. संजय जगताप, व समन्वयक श्री. ईश्वर मुगळे यांनी सह्या केल्या.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा आणि एनसीन एंटरप्रेनरशिप स्टार्टअप अँड इनोव्हेशन एन्सिन फोरम, पुणे यांच्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि स्थानिक स्टार्टअप इकोसिस्टमचा विकास घडवून आणण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अस्वले यानी केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ पीटले, इन्क्युबेशन सेंटरचे प्रमुख डॉ. अशोक पदमपल्ले, IQAC प्रमुख डॉ. व्ही. डी. देवरकर, केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी, करिअर कट्टा समन्वयक डॉ एस पी पसरकल्ले, डॉ एस टी. तोडकर यांची उपस्थिती होती.
या सहकार्याचा मुख्य उद्देश महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देणे, तरुणांना यशस्वी उद्योजक व रोजगारनिर्माते बनण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे शाश्वत आणि स्केलेबल स्टार्टअप्समध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक इकोसिस्टम विकसित करणे असून
या सामंजस्य कराराअंतर्गत, दोन्ही संस्था पुढील क्षेत्रांमध्ये उद्योजक व नवप्रवर्तकांना सशक्त पाठबळ देतील. यासाठी स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, सह-कार्य क्षेत्राची उपलब्धता, तांत्रिक सहाय्य व संसाधनांचे वितरण, प्री-इन्क्युबेशन व इन्क्युबेशन सेवा, निधी मिळवण्यासाठी सहाय्य, नेटवर्किंग व औद्योगिक सहकार्याच्या संधी असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी युवक याना सशक्त आणि प्रगतीशील स्टार्टअप्स उभारण्यास मदत होईल, हा सामंजस्य करार स्थानिक व प्रादेशिक स्तरावर स्टार्टअप इकोसिस्टम घडवण्यासाठी एक दिशादर्शक प्रयत्न ठरेल. नवउद्योजकांना योग्य दिशा, प्रेरणा आणि समर्थन मिळवून देण्यासाठी हे सहकार्य मोलाची भूमिका बजावेल असे मनोगत फोरम संचालक डॉ जगताप आणि प्राचार्य डॉ अस्वले यानी केले.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












