धाराशिव : जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने हजरत उमर चौक ग्रुप धाराशिव यांच्या वतीने दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी (सोमवार) सकाळी हजरत उमर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन हजरत उमर चौक चे मार्गदर्शक सय्यद खलील सर माजी नगरसेवक, आरिफ मुलानि उपाध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
शहरातील असंख्य नागरिक व युवकांनी उत्साहाने यात सहभाग नोंदवून रक्तदान केले. या कार्यक्रमाला शाकीर शेख, (कामगार व कर्मचारी काँग्रेस उस्मानाबाद), मुनीर शेख (मार्गदर्शक), कफील सय्यद (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस उस्मानाबाद), अरबाज शेख (अध्यक्ष) यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मोहम्मद अली अब्दुल शेख, कलीम कुरेशी अस्लम मुजावर, फैसल मुजावर, सादिक शेख सादिक शेख, अजमल मुलानी, जावेद शेख, मुजमील पठाण, अज्जू भाई शेख, सय्यद कैफ, पुरखान सिद्दिकी, तशकिल सय्यद, काझीम मुलानी, तसेच हजरत उमर चौक ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर रेणुका ब्लड बँक, बार्शी यांच्या सहकार्याने पार पडले.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












