चक्क अंत्यविधी देखील कोसळणाऱ्या धारांमध्येच थंडावला ?
मातंग समाज स्मशानभूमी असून अडचण नसून खोळंबा !
मढ्यावरील लोणी खाणारे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील निर्ढावलेले बोके कोण ?
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – ऊन, वारा, पाऊस व संकुचित वृत्तीने झपाटलेल्या मानवनिर्मित संकटाचा सामना करीत कुडाच्या झोपडीत अख्ख आयुष्य कंठले. जन्मापासून मृत्यूपर्यंत वनवास चिकटून राहतो, तो फक्त गरीब पिचलेल्यांचे मागे. वृद्धापकाळ म्हणा किंवा इतर कारणाने देहांत झाल्यानंतर मृत शरीराचा वनवास संपला असे म्हणतात. मात्र, पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना देखील निसर्गाने पाठवली नाही. मृतदेहावर सरण रचले खरे. परंतू स्मशान भूमी गळकी असल्यामुळे धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या धारा थेट सरनावरील मढ्यावरच बदबदा कोसळल्या. त्यामुळे पेटलेली चिता तर विझलीच. कळस म्हणजे अख्ख्या सरणाच्या भोवताली गुडघ्या इतके पाणी साचले. त्यामुळे पार्थिव देह भिजून ओला चिंब झाला. हे चित्तरकथा काल्पनिक नसून धाराशिव शहरातील मातंग स्मशानभूमीतील झंझणीत अंजण घालणारी विदारक वास्तविकता आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्रेताच्या अर्धवट विझलेल्या सरणावर तळवट व छत्र्या धरुन बसण्याची दुर्दैवी वेळ ओढावली. मढ्याची अर्थात पार्थिवाची अशी होणारी विटंबना आणि अवहेलना पाहून लोकप्रतिनिधी, प्रशासन व व्यवस्थेला जाग येणार की नाही ? तसेच मढ्यावरचे लोणी खाणारी खरीखुरी जात लोकप्रतिनिधींची की प्रशासनातील पांढरपेशा बोक्यांची ? असा संतप्त सवाल नातेवाईकांसह मातंग समाज विचारत आहे.
धाराशिव शहरातील मातंग समाजातील दत्ता सादु चव्हाण यांचा दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. तर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तुळजापूर नका परिसरातील पापनस नगर येथील स्मशान भूमी मध्ये नेण्यात आले. प्रेताला अगदी देण्यासाठी चिता रचली त्यावर देह ठेवला व नातेवाईकांनी भडाग्नी दिला. भडाग्नी दिल्याबरोबर अवघ्या पाच मिनिटांच्या फरकाने मुसळधार पावसाने सुरुवात केली. मात्र स्मशानभूमीचे बांधकाम जीर्ण होऊन दुरावस्था झाल्याने पावसाच्या पाण्याच्या धारा थेट चितेवरच पडू लागल्या. त्यामुळे क्षणार्धातच मढे (पार्थिव) ओले चिंब झाले. त्यामुळे नातेवाईकांनी तळवट आणि छत्र्या आणून धूर थेट निघणाऱ्या चितेवर धरल्या. मात्र पावसाचा जोर इतका होता की पूर्ण शेतीला चारही बाजूने गुडघ्या इतक्या पाण्याने घेरले. त्यामुळे दत्ता चव्हाण यांचे पार्थिव मरणानंतर देखील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पुढारी यांच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या याचनांचेच ओझे घेऊन पाण्यात थंडगारपणे निपचत तरंगत राहिले. त्यामुळे नगर परिषद प्रशासन लोकप्रतिनिधींनी जनाची नाही तर मनाची बाळगून निकृष्ट दर्जाचे काम करणार नाही व कोणाला करू देणार नाही असा वृद्ध संकल्प केला तर अशी अवयव यांना कोणाचीच होणार नाही.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786














