• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर…

lokmadat news by lokmadat news
September 12, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
49
VIEWS

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून विकास निधीवरील स्थगिती उठणार का याकडे लक्ष
धाराशिव, दि. १२ (प्रतिनिधी) : राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याने सर्वांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १.१५ वाजता सरनाईक सोलापूर शासकीय विश्रामगृहातून खाजगी वाहनाने धाराशिवकडे रवाना होतील. दुपारी २.१५ वाजता तुळजापूर येथे आगमन होऊन शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विविध स्थळांची पाहणी व आढावा ते घेणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता तुळजाभवानी मंदिरातून खाजगी वाहनाने ते धाराशिवकडे प्रयाण करतील. संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे आगमन होऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. रात्री ९ वाजता ते शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.
बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.२५ वाजता शासकीय वाहनाने ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ८.३५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होऊन सकाळी ८.४५ वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे रवाना होऊन १०.१० वाजता तिथे आगमन करतील. उम्मीद निदान केंद्र व रक्त साठवण केंद्राचे उद्घाटन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी १०.५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे प्रयाण होऊन सकाळी ११ वाजता ध्वज उभारणी कार्यक्रमाच्या ४५ मीटर ध्वजस्तंभ भूमिपूजनास ते उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते त्यांच्या निवासस्थानकडे ठाण्याकडे रवाना होतील.
या दौऱ्यातील कार्यक्रमांसोबतच जिल्ह्याच्या विकासाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न देखील ऐरणीवर आले आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती देण्यात आली असून, त्यामुळे विकासकामांवर ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्यात स्थगिती उठवली जाणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी ते काय नियोजन मांडतात, तसेच ऐन वेळी नियोजन समितीची आढावा बैठक घेऊन कोणते निर्णय घेतले जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन या सर्वांचे लक्ष आता या दौऱ्याकडे लागले आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #धाराशिव #उस्मानाबादdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआढावा बैठकजिल्हा नियोजन समितीजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवडीपीडीसीपरिवहन मंत्रीपालकमंत्रीप्रताप सरनाईकभाजपाभारतीय जनता पक्षमहायुतीविकास आराखडाशिवसेना
SendShareTweet
Previous Post

महादेव कोळी जमातीला हैद्राबाद गॅझेट लागू करा
मराठवाडा सकल आदिवासी कोळी-महादेव संघटनेची मागणी

Next Post

“शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

"शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू...विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT