• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू” – आमदार कैलास पाटील यांचा इशारा

lokmadat news by lokmadat news
September 14, 2025
in कृषी
0
0
SHARES
9
VIEWS

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू” – आमदार कैलास पाटील यांचा इशारा

धाराशिव ता. 14: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यांतील अश्रू पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे., “मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल,” असा थेट इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील शेलगाव (ज), सातेफळ, वाघोली यासह अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
आमदार पाटील म्हणाले की , “पाहणी वेळी प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि भविष्यातील अनिश्चितता स्पष्टपणे जाणवत आहे. जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतपिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, जनावरांसाठी चारा शिल्लक नाही. अनेकांची घरे आणि संसार उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.”
सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की , “अशा गंभीर परिस्थितीतही मायबाप सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, हे अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. आणखी किती हानी झाल्यावर सरकारच्या यंत्रणेचे डोळे उघडणार, हा मोठा प्रश्न आहे.”

दौऱ्यानंतर आमदार पाटील यांनी शासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मदतीत दुजाभाव का?
ऑगस्टमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धाराशिव जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात मदत देऊ केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ही मदत का दिली नाही असा प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे. मदतीच्या बाबत सुद्धा हे सरकार दुजाभाव करत असल्यामुळे त्यांचं शेतकऱ्यांप्रती असलेलं ढोंगी प्रेम लक्षात येत आहे असंही पाटील यांनी म्हटले आहे.

Tags: #धाराशिव #उस्मानाबादdharashivosmanabadआ. कैलास पाटीलआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव
SendShareTweet
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

Next Post

धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार… सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय

Related Posts

कृषी

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करा – डॉ.प्रतापसिंह पाटील

February 26, 2026
कृषी

तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

February 24, 2026
कृषी

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

February 12, 2026
कृषी

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

January 11, 2026
कृषी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये  शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

January 2, 2026
कृषी

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन

November 19, 2025
Next Post

धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार... सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT