विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय – पोलीस अधीक्षक आमना
धाराशिव येथे जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेस मोठा प्रतिसाद
धाराशिव: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तायकांदो स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्येही तायक्वांदो स्पर्धेतील खेळाडूंना चांगला लाभ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत तायक्वांदो खेळाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी केले.
धाराशिव येथे जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर घेण्यात आल्या. पोलीस अधीक्षक आमना यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे म्हंटले, आजच्या युगातील विद्यार्थी हे टीव्ही, सोशल मीडिया, मोबाईल यांचा जास्त वापर करीत असल्याने त्यांना मैदानावर आणण्यासाठी पालकांना अधिक परिश्रम करावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना सोशल मीडिया, टीव्ही, मोबाईल यापासून दूर ठेवायचे असेल तर अधिकाधिक काळ ते मैदानावर असणे आवश्यक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी. बी. कासराळे, सचिव राजेश महाजन, क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी, सहसचिव सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत, अक्षय बिराजदार उपस्थित होते. शालेय तायक्वांदो स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच म्हणून राम दराडे, शरीफ शेख, स्मिता गायकवाड, प्रज्ञा पाटील, माधव महाजन, चेतन तेरकर, सुमेध चिलवंत यांनी काम केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश महाजन, अनिल बळवंत, सूर्यकांत वाघमारे, विक्रम सांडसे यांनी प्रयत्न केले.
या खेळाडूंनी मिळविले यश
जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत (१४,१७,१९ वर्ष वयोगट) यश मिळविलेल्या खेळाडूंमध्ये रोहित गोरे, समर्थ कदम, अर्णव ढेकणे, कुलजित इंगळे, प्रणित बनसोडे, जटनुरे कार्तिक, अंश गायकवाड, अनुराग पाटील, यशराज आवटे, संघर्ष कांबळे, अथर्व गरड, राजेश ढेकणे, पृथ्वीराज डाके, विनीत कुमार रंगदळ, स्वराज नलावडे, ऋत्विक ठाकर, हर्षवर्धन शिंदे, किरण हिंगमिरे, वैभवी सगट, रेणुका सरवदे, सृष्टी जगदाळे, ज्ञानेश्वरी कुंभार, प्रांजल भुतेकर, क्षितिजा निंबाळकर, संस्कृती कपाळे, संस्कृती नलावडे, श्रेयशी सरपाळे, स्वरा कांबळे, स्वरा फडकुले, मृणाल हजारे, तेजस्विनी बांगर, मधुरा महाजन, स्वराली पडवळ, सफल केसकर, वैष्णवी साळुंखे, प्रतीक्षा चौधरी, सोनाली गटकुळ, वैष्णवी जगताप, श्रद्धा कदम यांचा समावेश आहे. सर्व विजेते खेळाडू लातूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786













