राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड
धाराशिव दि. 15 :भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी राहुल हरिभाऊ काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये राहुल काकडे यांचा दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांमध्ये असलेली पकड तसेच मागील कार्यकाळात पक्ष संघटनासाठी केलेले योगदान याची दखल घेऊन धाराशिव जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल धाराशिव जिल्हाभरातून काकडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नूतन जिल्हाध्यक्ष राहुल काकडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली “युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यासाठी स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायाच्या संधी निर्माण करणे हीच माझी प्राथमिकता राहील.” तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, मित्राचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे भक्कम संघटन उभे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी राहुल काकडे यांनी पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786













