• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

“हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम

lokmadat news by lokmadat news
February 7, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
6
VIEWS

“हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम

धाराशिव लोकमदत न्यूज

आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले.यानिमित्ताने नागरिकांमध्ये मतदानाबाबत जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व प्रादेशिक वन विभागामार्फत जिल्ह्यात “हरित मतदान केंद्र” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील शेकापूर प्राथमिक शाळा आणि तुळजापूर तालुक्यातील हंगरगावडी प्राथमिक शाळा येथे हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली.या मतदान केंद्रांवर रोपवाटिकेतील स्थानिक प्रजातींच्या रोपांच्या सहाय्याने परिसर हिरवागार करण्यात आला होता.

पर्यावरणपूरक सजावटीमुळे मतदान केंद्राचा संपूर्ण परिसर आकर्षक व नैसर्गिक वातावरणाने नटलेला दिसून आला.मतदारांमध्ये पर्यावरण संवर्धन व मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या केंद्रांवर विविध माहितीपर फ्लेक्स लावण्यात आले होते.या फ्लेक्सच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे महत्त्व,वृक्षतोडीचे दुष्परिणाम तसेच मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.वृक्ष लावा – पर्यावरण वाचवा आणि मतदान करा – लोकशाही बळकट करा असा दुहेरी संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या हरित मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष सेल्फी पॉइंटची देखील व्यवस्था करण्यात आली होती.नैसर्गिक वातावरणात मतदान करण्याचा अनुभव घेत मतदारांनी उत्साहाने सेल्फी काढले व या अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेकापूर येथील हरित मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत नागरिकांना वृक्षलागवड व संवर्धनासाठी प्रोत्साहित करण्यात आले.एकूणच,हा “हरित मतदान केंद्र” उपक्रम मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला.पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही कर्तव्य यांचा सुंदर संगम साधण्यात सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाला यश आले.

SendShareTweet
Previous Post

सत्ताधाऱ्यांची नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यास टाळाटाळ.! शहरातील विकास कामांच्या नावाने चांगभलं !

Next Post

मुगाव येथे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क… लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

मुगाव येथे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क... लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT