• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

कलेच्या नावाखाली देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार 4 कला केंद्रांवर रॅकेटचा पर्दाफाश, 9 आरोपींवर गुन्हा

lokmadat news by lokmadat news
March 20, 2026
in क्राईम
0
0
SHARES
571
VIEWS

धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त महाकाली, पिंजरा, साई कला केंद्र पुन्हा चर्चेत कलेच्या नावाखाली देहव्यापार रॅकेट उघड, 9 आरोपींवर गुन्हा


धाराशिव | लोकमदत न्यूज


धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त ठरलेली महाकाली, पिंजरा व साई कला केंद्रे पुन्हा एकदा गंभीर कारणांमुळे चर्चेत आली असून, कलेच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापाराच्या रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. एका विवाहित पीडित महिलेच्या तक्रारीवरून 9 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये पुणे वाघोली येथील सोनाली वाघ, लातूर येथील सचिन चंद्रकांत कापसे, सोनाली चंद्रकांत कापसे, अजय कापसे, अनिता कापसे, कविता कोळपेकर, बीड परळी येथील माधुरी गिरी, तसेच धाराशिव येथील अंजली यांचा समावेश आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, ती विवाहित असून पतीकडून होत असलेल्या मारहाणीला कंटाळून तिने तिची व्यथा मैत्रीण सोनाली वाघ हिला सांगितली. त्यानंतर तिला येडशी येथील पिंजरा कला केंद्रात आणण्यात आले. येथे तिची ओळख मालकीण कविता कोळपेकर व व्यवस्थापक सचिन चंद्रकांत कापसे यांच्याशी करून देण्यात आली. काही दिवसांतच येथे ग्राहकांसाठी मुलींची निवड करून देण्याचा प्रकार सुरू असल्याचे तिच्या लक्षात आले.
तिने विरोध केल्यानंतर तिला मारहाण करून जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर सचिन कापसे याने एका ग्राहकासोबत लॉजवर नेऊन जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. लग्नाचे आमिष दाखवूनही तिच्याशी संबंध ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर आरोपींनी तिला लातूर येथे नेले, जिथे सोनाली चंद्रकांत कापसे हिच्याकडे काही दिवस ठेवून पुन्हा मारहाण करण्यात आली. पुढे औसा रोडवरील बुधडा कला केंद्र येथे रेखा जाधव या मालकीणीकडे तब्बल 30 हजार रुपयांत “कामासाठी” ठेवण्यात आले. येथेही तिला देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात आले.
त्यानंतर सोनाली कापसे व अनिता कापसे यांनी तिला येरमाळा येथील महाकाली कला केंद्रात आणले, जिथे माधुरी गिरी हिच्याकडे राहण्यास भाग पाडून ग्राहकांकडून पैसे घेऊन देहव्यापार करवून घेतल्याचा आरोप आहे. तसेच साई कला केंद्र या नावाखालीही हा प्रकार सुरू असल्याचे पीडितेने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी पिटा कायदा तसेच भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 3(5), 351(3) व 64(2)(m) अंतर्गत पुणे ग्रामीणमधील वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान ॲड. अमोल वरुडकर यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना तक्रार ही आकसापोटी करण्यात आल्याचा दावा केला. तसेच आरोपींचा थेट सहभाग अद्याप स्पष्ट झालेला नसून ते तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे नमूद केले. कोणतीही जप्ती बाकी नसल्याने पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवादही करण्यात आला.
या युक्तिवादावर न्यायालयाने विचार करून आरोपी कविता कोळपेकर हिला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. वैभव खांडेकर, ॲड. बालाजी पोतदार, ॲड. सचिन जाधव, ॲड. जनक साळुंखे, ॲड. विक्रम माने व ॲड. दीपक तुपसुंदरे यांनीही काम पाहिले.
दरम्यान, जिल्ह्यातील कला केंद्रे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात असताना हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या अहवालानंतर काही कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा बसला का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी यापूर्वीच चुकीचे प्रकार करणाऱ्या कला केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, अशा प्रकारची घटना पुन्हा समोर आल्याने स्थानिक प्रशासनाने त्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी केली का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महाकाली, पिंजरा व साई कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले असून, जिल्ह्यातील इतर कला केंद्रांमध्येही अशाच प्रकारे महिलांचे शोषण होत आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. आता तरी प्रशासन कठोर कारवाई करणार का, की अशा प्रकारांना पुन्हा मोकळे रान मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

गॅस टंचाई – फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

Next Post

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

Related Posts

क्राईम

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

March 29, 2026
क्राईम

धाराशिव नगर परिषद पाण्यासाठी जनता त्रस्त… निर्जन भागात मात्र लाखोंच्या पाईपलाईन! यामागील मुख्य ‘आका’ कोण?

March 27, 2026
क्राईम

‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

March 20, 2026
क्राईम

गॅस टंचाई – फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

March 19, 2026
क्राईम

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

March 18, 2026
क्राईम

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी – बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

March 17, 2026
Next Post

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT