युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न ५९ युवकांनि केले रक्तदान
धाराशिव / लोकमदत न्यूज
युवानेते तथा सामाजिक उपक्रमांत सतत अग्रेसर असलेले रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर तुळजाभवानी शॉपिंग सेंटर येथे गरुडा साम्राज्य ग्रुपच्या वतीने हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरात तब्बल ५९ युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. राज्यात दररोज जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता वाढदिवसानिमित्त होणारा हार्डिंग, बॅनर, आतिषबाजी व इतर अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी बोलताना रोहित जाधव म्हणाले की, “वाढदिवस हा केवळ जल्लोषासाठी नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी वाढदिवसावरील वायफळ खर्च टाळून रक्तदान, आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत असे उपक्रम राबवावेत. आपण केलेले एक रक्तदान एखाद्या रुग्णाला जीवदान देऊ शकते.”
गरुडा साम्राज्य ग्रुपच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
या वेळी रोहित जाधव मित्रपरिवारातील समीर अरब, अविनाश चव्हाण, रोहित गुजर, रोहित डोकडे, राजू गायकवाड, विशाल कठारे, लहू पवार, ओंकार चौघुले, आकाश मंजुळे, योगेश पवार, बालाजी जाधव उपस्थित होते.
तसेच रेणुका ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. यामध्ये संजय शिंदे (संचालक), मनोज इंगळे (संचालक), सुमित मुठाळ (टेक्निशियन) तसेच मिसबा काझी, प्राजक्ता मस्के, स्वाती बेद्रे, गौरी गुजरे, वैष्णवी शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












