• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय

lokmadat news by lokmadat news
February 17, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
27
VIEWS


धाराशिव शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय

सहा मजले, १६ कोर्ट आणि प्रशस्त सभागृहाचा समावेश : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव / लोकमदत न्यूज

  जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव शहराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जिल्ह्याच्या वाढत्या विस्ताराचा आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून, शहरात अत्याधुनिक व नवीन सहा मजली जिल्हा व सत्र न्यायालय इमारत उभारली जाणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी ८९ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चाला उच्च स्तरीय समितीची मंजुरी मिळाली आहे. तुळजापूर येथील वातानुकूलित न्यायालय इमारती पाठोपाठ आत ही इमारतही जिल्ह्याची ठळक ओळख ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली होणारी ही इमारत पूर्णपणे ‘हायटेक’ असणार आहे. जुन्या इमारतीची अवस्था पाहता, आता ‘तळमजला अधिक ६ मजले’ असे सुसज्ज न्यायभवन उभारण्यात येणार आहे. यामध्ये एकूण १६ कोर्ट हॉल असतील, ज्यात विशेष पोक्सो (POSCO) कोर्ट, लोक न्यायालय आणि हाय सिक्युरिटी कोर्टाचाही समावेश असणार आहे. पक्षकार आणि वकिलांच्या सोयीसाठी ३ आणि न्यायाधीशांसाठी स्वतंत्र ३ अशा एकूण ६ लिफ्ट या इमारतीमध्ये बसवण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही इमारत ‘हरित संकल्पनेवर’ (Green Building) आधारित असेल. यात सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची विशेष तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली राहणार असून सक्षम आणि आधुनिक आग प्रतिबंधक यंत्रणाही याठिकाणी बसवली जाणार आहे. प्रशस्त अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, सुसज्ज फर्निचर आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेलची व्यवस्थाही इमारत आराखड्यात करण्यात आली आहे. सध्याची जुनी इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये कमकुवत झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच, नियमानुसार जुन्या इमारतीचे पाडकाम केले जाईल, जेणेकरून सुरक्षिततेचा कोणताही प्रश्न राहणार नसल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. धाराशिव शहरात होऊ घातलेल्या या भव्य न्यायालय इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हावासियांच्या वतीने मनापासून आभार मानले आहेत.

इमारत शहराचे एक महत्त्वाचे ‘लँडमार्क’ ठरेल,
लवकरच कामाला सुरुवात : आमदार पाटील

मुंबई उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या निकषानुसार व मानांकनानुसार ही इमारत साकारली जाणार आहे. मुंबई येथील मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी या इमारतीच्या नकाशांना आणि आराखड्यांना मंजुरीही दिली आहे. एकूण १५ हजार ८२३.६१ चौरस मीटर क्षेत्रफळात ही देखणी आणि भव्य वास्तू उभारली जाणार आहे. ही इमारत शहराचे एक महत्त्वाचे ‘लँडमार्क’ ठरेल, असा विश्वास असून न्यायालयाच्या या नवीन इमारतीमुळे वकील बांधव आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो पक्षकारांना हक्काची आणि सोयीची जागा उपलब्ध होणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापुर नगरीत संपूर्ण वातानुकूलित न्यायालय इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. आता धाराशिव शहरातही एक भव्य आणि आकर्षक वास्तू लवकरच पहायला मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

SendShareTweet
Previous Post

परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात

Next Post

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा २४ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे आक्रोश मोर्चा !

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा २४ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे आक्रोश मोर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT