• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

तुळजापूर येथे शेकडो महिलांचा सहभागाने भव्य जलयात्रा उत्साहात संपन्न

lokmadat news by lokmadat news
December 31, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
4
VIEWS

शेकडो महिला भगिनींच्या सहभागाने तुळजापुरात भव्य जलयात्रा उत्साहात संपन्न

       धाराशिव,दि.20(प्रतिनिधी):- श्री क्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्रोत्सव २८ डिसेंबरपासून अत्यंत भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून, या पवित्र उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेली भव्य जलयात्रा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. शेकडो महिला भगिनींच्या सहभागाने निघालेल्या या जलयात्रेमुळे संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हालेली दिसून आली.

धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीचा ‘शाकंभरी’ अवतार पौष शुक्ल अष्टमीच्या दिवशी साकार झाला. अन्नधान्य, वनस्पती आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवी म्हणून शाकंभरी देवींची पूजा केली जाते. या श्रद्धेच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात दरवर्षी पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या जलयात्रेला पापनाश तीर्थ कुंडातून प्रारंभ झाला. पवित्र जलाने भरलेले कलश डोक्यावर घेत, पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिला भगिनींनी या जलयात्रेत भक्तिभावाने सहभाग नोंदवला. संबळाच्या कडकडाटात, ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या निनादात आणि ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहोचली. गाभाऱ्यात विधिवत जलअर्पण करण्यात आले.

जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरी देवींच्या प्रतिमेची विशेष आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध प्रकारचा भाजीपाला (शाक) आणि फळांचा वापर करून केलेली ही सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. अन्नधान्य व समृद्धीचे प्रतीक असलेल्या देवी शाकंभरींच्या या स्वरूपाने भाविकांमध्ये श्रद्धा, कृतज्ञता आणि भक्तिभाव अधिक दृढ झाला.

या भव्य जलयात्रेत महिला भगिनींसोबतच गोंधळी, आराधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात संपूर्ण मिरवणूक अत्यंत आनंदी व भक्तिमय वातावरणात पार पडली. मिरवणुकीत सहभागी झालेले घोडे आणि सजवलेल्या बैलगाड्या या देखील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या.या पवित्र सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष विनोद गंगणे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, उपाध्ये बंडू पाठक, शाकंभरी नवरात्र उत्सवातील यंदाचे यजमान उल्हास कागदे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे, जयसिंग पाटील, महेंद्र आदमाने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी-कर्मचारी, पुजारी बांधव तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी…पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

Next Post

उरुसात भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन ठेकेदारावर कारवाई करण्याची नगराध्यक्ष काकडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

उरुसात भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन ठेकेदारावर कारवाई करण्याची नगराध्यक्ष काकडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT