धाराशिवमध्ये परिवर्तनाची नवी लाट; राष्ट्रवादीची तुतारी घुमण्यास सज्ज!
प्रभाग आठ मध्ये परवीन कुरेशी व स्वाती सचिन बनसोडे व महेश दिलीप बागल यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जंगी पदयात्रा
धाराशिव शहरात यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाची जोरदार लाट उठत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) शहराच्या विकासाचा नवा इतिहास लिहिण्यास सज्ज आहे. “यंदा पवार साहेबांची तुतारी घुमणार आणि शहराचा अभिमान उंचावणार,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
नगराध्यक्षपदासाठी परविन खलील उर्फ खलिफा कुरेशी हे बटन क्रमांक 2 वरून मैदानात असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्व देण्याचा त्यांचा मानस आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार खालीलप्रमाणे :प्रभाग ८-अ : सौ. स्वाती सचिन बनसोडे,प्रभाग ८-ब महेश दिलीप बागल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांची भव्य पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेत या प्रभागातील तरुण व युवकांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, रस्ते सुधारणा आणि परिसराच्या उज्वल भविष्यासाठी व्यापक आराखडा मांडला असून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
जनतेला आवाहन करताना डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी स्पष्ट केले की,
“तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून खऱ्या जनसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आता आपल्या शहराच्या खऱ्या विकासाची खरी सुरुवात करूया!”
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीची तुतारी पुन्हा एकदा घुमण्याची चिन्हे दिसत असून, या उमेदवारांच्या माध्यमातून शहर विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.













