आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांच्या स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स कार्यालयाचे उद्घाटन
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) – तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव शहरातील तरुण उद्योजक कुणाल निंबाळकर आणि बालाजी जाधव यांनी नव्याने सुरू केलेल्या स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स या कार्यालयाचे उद्घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दि.५ जानेवारी रोजी करण्यात आले.
धाराशिव शहरातील समर्थ सिटी बिल्डिंगमध्ये स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी शुभेच्छा देताना आमदार पाटील म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबनाची वाट निवडणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करणे आणि विकासात हातभार लावणे हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी
सुरेश देशमुख, नगराध्यक्ष नेहा काकडे, अमित शिंदे, मधुकरराव तावडे, निंबाळकर व जाधव कुटुंबीय, आदींसह नागरिक उपस्थित होते.















