• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

lokmadat news by lokmadat news
February 15, 2026
in क्राईम
0
0
SHARES
118
VIEWS

‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !

पालकमंत्र्याचे आदेश अडकले कला केंद्रातील ‘त्या घुंगरात’ !

धाराशिव / लोकमदत न्यूज

जिल्ह्यात कला केंद्रांचा पुन्हा नंगानाच सुरु झाला आहे. जिल्ह्यातील कला केंद्र बंद करावीत तसेच नियमानुकुल करावीत असे आदेश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेले होते. जिल्हा प्रशासनाने देखील तोंड देखलेपणा करीत काही कला केंद्रांना नोटिसा बजावीत कागदोपत्री नियमानुकूल बंद असल्याचा बेबान केला. पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ते आदेश कला केंद्रातील त्या कोणत्या ‘घुंगरात’ अडकले आहेत ? विशेष म्हणजे या काही कला केंद्रामध्ये रात्रभर ‘नंगा’नाच केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यांना कोणाचीच भीती व धाक राहिलेला नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारामुळे गाजत असलेल्या… कला केंद्राने… पुन्हा एका तरुणाचा बळी घेतला असल्याची दुर्दैवी घटना दि.१२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली आहे. चोराखळी येथील महाकाली कला केंद्रातील कार्यक्रम बंद आहे ?  दरम्यान, या कला केंद्रातील कला पाहून गावाकडे परतणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका ३७ वर्षीय तरुणास मागील भांडणाची कुरापत काढीत त्याच्यासोबत आलेल्या पाचजणांनी लाथा-बुक्क्यांनी ठेचून त्याचा निघृन खून केला आहे. त्यामुळे या कला केंद्रात नेमके कोणाच्या परवानगीने किती वाजेपर्यंत चालतात याचे गौडबंगाल जिल्हावासियांसमोर येणे अत्यावश्यक बनले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील सतीश भागवत मुंडे (वय – ३७ वर्षे) हे साळेगाव येथीलच शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्धन गिते, मधुकर गोरोबा इंगळे व दत्ता बाबासाहेब तोंडे यांच्याबरोबर दि.१२ कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात तेथील नयन चाळे पाण्यासाठी गेले होते. कार्यक्रम पाहिल्यानंतर ते सतीश मुंडे यांच्यासह सर्वजण मिळून साळेगावकडे वाहनांमध्ये जात होते. दरम्यान, शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्धन गिते, मधुकर गोरोबा इंगळे व दत्ता बाबासाहेब तोंडे या पाच आरोपींनी सतीश मुंडे याच्याबरोबर जुन्या भांडणाची कुरापत काढून मुंडेला जीवे मारण्याच्या उद्देशाने महाकाली कला केंद्रापासून साळेगाव दरम्यानच्या रस्त्यातच दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० ते दि. १३ फेब्रुवारी दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत त्याच्या छाती आणि पोटावर लाथा व बुक्क्यांनी जबर मारहाण करून एक प्रकारे ठेचण्याचाच प्रकार केला. त्यामुळे मुंडेला त्या निष्ठूर सैतानांनी ठार केले. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मुंडेचे वडील भागवत बळीराम मुंडे (वय – ७९ वर्षे) व्यवसाय शेती यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि.१५ फेब्रुवारी रोजी गु. र.न.- ३८/२०२६ कलम १०३ (१), १९१ (२), ११५ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भोजगुडे हे करीत आहेत.
हे प्रकरण अतिशय गंभीर व जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. पालकमंत्री सरनाईक याबाबत काय भूमिका घेतात आणि जिल्हावासियांना या नरक यातनेतून केव्हा व कसे मुक्त करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

उजनी धरणावर नगराध्यक्षांचा पाणी पुरवठा सभापती विना पाहणी दौरा अंतर्गत वादात ?

Next Post

बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी तर कार्याध्यक्ष पदी सुधीर पवार

Related Posts

क्राईम

नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

February 26, 2026
क्राईम

धाराशिव नगरपरिषदेत ‘तिजोरीच्या चाव्या’ ठेकेदाराच्या हाती? अकाउंट विभागात गुत्तेदारांची बसायची ‘राजशाही’ थाट!

February 25, 2026
क्राईम

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

February 12, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

February 3, 2026
क्राईम

धाराशिव येथे आर्थिक वादातून कुरेशींच्या वीट भट्टीवर तरुणावर निर्घृण हल्ला लाथाबुक्यांनी व काठीने जबर मारहाण

February 2, 2026
Next Post

बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी तर कार्याध्यक्ष पदी सुधीर पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT