आंबेवाडी अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तता
धाराशिव दि.१६(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता केली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील सी. खटी यांनी हा निकाल दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी दिला.
सन २०१९ मध्ये आंबेवाडी येथे ऊसतोडीचे काम सुरू असताना ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवल्याने एका ऊसतोड मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बेंबळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संबंधित खटल्यात धाराशिव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
या निकालाविरुद्ध अपील दाखल करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. महेश विजयकुमार कोकाटे यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानुसार सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता दिली. या खटल्यात ॲड. महेश कोकाटे यांना ॲड. प्रविण रामचंद्र पाटील यांनी सहकार्य केले.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












